ताज्या बातम्यादेश-विदेश

भारतात मोदी सरकार येणार समजताच पाकिस्तान चिंतेत; पाकच्या माजी परराष्ट्र सचिवांनी दिला इशारा


पाकिस्तानचे माजी परराष्ट्र सचिव इजाज चौधरी म्हणतात, मोदींचे धोरण पाकिस्तानसाठी आक्रमक असेलभारतात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीकडे साऱ्या जगाचे लक्ष आहे. निवडणुकांसाठीचे मतदान पार पडले असून निकाल ४ जून रोजी जाहीर होईल.

दरम्यान, एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली असून यातून भारतात पुन्हा मोदी सरकार सत्तेत येणार हे जवळपास निश्चित झाले आहे. एक्झिट पोलनुसार नरेंद्र मोदी स्पष्ट बहुमताने सलग तिसऱ्यांदा सत्तेत परत येऊ शकतात. या एक्झिट पोलची चर्चा भारताबरोबरच शेजारील देशांमध्येही केली जात आहे.

नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यास शेजारी देशांप्रती त्यांचे काय धोरण असेल याची चर्चा पाकिस्तानात सध्या सुरू आहे. पाकिस्तानचे माजी परराष्ट्र सचिव इजाज चौधरी यांनी यावर भाष्य केले आहे. एका टीव्ही चॅनलवर निवडणूक निकाल आणि भारतातील नवीन सरकार या विषयावरील चर्चेदरम्यान त्यांनी म्हटले की, भारताच्या निवडणुकीचा निकाल अद्याप आलेला नाही, परंतु एक्झिट पोलवरून असे दिसते की नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत येत आहेत. जर नरेंद्र मोदींच्या कार्यपद्धतीकडे पाहिले, तर असे दिसून येते की ते त्या आश्वासनांवर आणि केलेल्या दाव्यांवर पुढे जातात. यावेळी ते सरकारमध्ये आले तर दोन गोष्टी विशेष होतील, एक म्हणजे भारत हिंदू राष्ट्र बनणे आणि दुसरी पाकिस्तानशी संघर्ष,’ अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.

चौधरी यांनी असेही म्हटले आहे की, ‘नरेंद्र मोदींच्या ट्रॅक रेकॉर्डवरून असे दिसून येते की ते निवडणूक जाहीरनामा आणि दावे लागू करतात. त्यामुळे भारताला हिंदू राष्ट्र बनवणे हे त्यांच्या सरकारचे यावेळचे एक ध्येय असेल असे वाटते. दुसरे म्हणजे ते पाकिस्तानबाबत आक्रमक धोरण स्वीकारतील, ज्याचा उल्लेख ते ‘घुसकर मारेंगे’ असा करतात.’

इजाज चौधरी पुढे म्हणाले की, २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी कलम ३७० चा उल्लेख केला आणि सर्वांना दणका देत ते हटवलेही. यावेळी स्पष्टपणे त्यांचे लक्ष्य हिंदू राष्ट्र आहे. दुसरे म्हणजे, ते शेजारी राष्ट्रांसाठी विशेषतः पाकिस्तानसाठी आक्रमक असतील. ते पाकिस्तानच्या बाबतीत ‘घुसके मारेंगे’ या त्यांच्या अजेंड्यावर पुढे जाऊ शकतात. अशा परिस्थितीत पाकिस्तानने पूर्ण तयारी करायला हवी, असा इशारा इजाज चौधरी यांनी पाकिस्तानला दिला आहे.

Live लोकसभा निवडणूक निकाल 2024,भारतात पुन्हा कमळ फुलणार


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
  • .
Back to top button