क्राईम

दिरानेच महिलेवर केला बलात्कार ,दीर आणि पती सोबतच खोलीत आले पुढे काय घडल ?


लखनऊ : एका महिलेसोबत धक्कादायक घटना घडली. तिच्याच दिराने तिच्यावर अत्याचार केले. यानंतर तिने याबद्दल पतीकडे तक्रार करताच पतीने जे काही केलं, ते आणखीच धक्कादायक होतं. उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये दिरानेच एका महिलेवर बलात्कार केला.

यानंतर पती आपल्याच पत्नीला वहिनी म्हणू लागला. त्यानंतर महिलेचा पती आणि दिराने महिलेला मारण्याचा प्रयत्न केला. हत्येच्या प्रयत्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करावी, अशी विनंती महिलेनं केली आहे. पोलिसांनी आरोपी पती आणि दिराविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. खतौली कोतवाली भागातील रहिवासी असलेल्या पीडित महिलेचा विवाह बुढाणा भागातील रहिवासी साजिद याच्याशी झाला होता. पीडित महिलेनं तिच्या तक्रारी पत्रात आरोप केला आहे की, रमजानच्या काळात 2 एप्रिल रोजी तिचा पती बाहेर गेला असताना तिचा दीर सलमानने तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला.

महिलेनं सांगितलं की, जेव्हा तिचा पती घरी आला तेव्हा तिने त्याला या घटनेबद्दल सांगितलं. यावर पती साजिद म्हणाला, की तू आता माझी पत्नी नाहीस. आता तू माझी वहिनी झाली आहेस. पुढच्या दिवशी पती आणि दीर दोघं महिलेच्या खोलीत आले. त्यांनी महिलेच्या गळ्यात ओढणी बांधून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही महिलेनं केला आहे. दीर मोबाईलमध्ये त्याचा व्हिडिओ बनवत होता. कसं तरी त्यांच्या तावडीतून सुटून आपला जीव वाचवल्याचं महिलेचं म्हणणं आहे.

एसपी सिटी सत्यनारायण प्रजापत यांनी सांगितलं की, महिलेच्या तक्रारीच्या आधारे खतौली पोलीस ठाण्यात पीडित महिलेचा पती आणि दिराविरुद्ध बलात्कार आणि जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींच्या अटकेसाठी छापेमारी सुरू आहे. लवकरच दोन्ही आरोपींना अटक करून कारवाई केली जाईल.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button