ताज्या बातम्यादिल्लीदेश-विदेशमहत्वाचेमहाराष्ट्रराजकीय

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापूर्वी जाहीर झालेल्या 365 जागांवरील निवडणुका ओबीसी आरक्षणाविना होतील


सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ओबीसी आरक्षणाला मंजुरी दिली आहे.परंतु, सुप्रीम कोर्टाच्या
एसबीसी प्रवर्गाला स्वतंत्र 2% आरक्षण मिळावे यासाठी राज्यात आंदोलनाला प्रारंभ सत्ताधारी ओबीसी नेत्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ओबीसी आरक्षणाला मंजुरी दिली आहे.
परंतु, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापूर्वी जाहीर झालेल्या 365 जागांवरील निवडणुका ओबीसी आरक्षणाविना होतील. याबाबत कुठलीही नवी अधिसूचना जारी होणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेय. तसेच यासंदर्भातील दिशानिर्देशांचे राज्य निवडणूक आयोगाने पालन न केल्यास त्याला न्यायालयाची अवमानना समजण्यात येईल असेही कोर्टाने सांगितले आहे.
बांठिया आयोगाने ओबीसींना 27 टक्के आरक्षण देण्याची शिफारस केली आहे. हे आरक्षण देताना अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती तसेच ओबीसी यांची सदस्य संख्या 50 टक्क्यांहून अधिक होऊ नये अशी अट आहे. त्यानुसार राज्यातील 27 महापालिकांमध्ये ओबीसींसाठी वेगवेगळ्या जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. बॅकवर्ड क्लास ऑफ सिटिझन या प्रवर्गामध्ये ओबीसींचा समावेश करुन त्यांच्यासाठी काही जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने बांठिया आयोगाचा अहवाल मान्य करत राज्यात ओबीसींना राजकीय आरक्षण लागू करण्यास मंजुरी दिली. राज्य निवडणूक आयोगाने 92 नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या. या नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणाबाबत सुनावणी सुरू होती. या 92 नगरपरिषदांमधील निवडणुका ओबीसी आरक्षणासह करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न सुरू होता. सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणाबाबत निकाल दिला त्यावेळी या संदर्भातली निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. त्यामुळे आता तिथे ओबीसी आरक्षण लागू करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. राज्य निवडणूक आयोगाने 14 जुलै रोजी या 92 नगरपरिषदांच्या निवडणुका स्थगित केल्याची घोषणा केली होती. पुणे , सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर,अमरावती आणि बुलढाणा या 17 जिल्ह्यातील 92 नगर परिषदा आणि चार नगरपंचायतीमध्ये निवडणुका होणार होत्या


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button