माजलगाव येथे सर्व धर्मीय बांधवांचा ईद मिलन व मस्जिद परिचय कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या संपन्न.
माजलगाव येथे सर्व धर्मीय बांधवांचा ईद मिलन व मस्जिद परिचय कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या संपन्न.
माजलगाव : आपल्या सभोवतालच्या गोरगरिबांची मदत करा , त्यांच्या समस्यांचे निराकरण करा ,आपल्या आनंदाच्या क्षणात सण उत्सवात सर्वांना सहभागी व सामील करून घ्या अशी इस्लामची शिकवण आहे .प्रेषित मोहम्मद यांनी चौदाशे वर्षांपूर्वी मस्जिदी मधून सर्व समाज सुधारण्याचे उपक्रम राबविले ,अक्षरशा छोट्यांसाठी मोठ्यांसाठी उजळणी वर्ग मस्जिदीमध्ये भरायचे !मस्जिद मानवाला निर्मात्याशी व मानवाला मानवाशी जोडण्याचे केंद्र आहे असे प्रतिपादन प्रख्यात इस्लामिक स्कॉलर प्राध्यापक वाजिद अली खान ( नाशिक ) यांनी माजलगावच्या मस्जिद अब्दुल गफुर येथे सर्व धर्मियांसाठी आयोजित ईद-मिलन कार्यक्रमात केले. कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी श्री गौरव इंगोले व पोलीस उपअधीक्षक श्री डॉ. बी. धीरज कुमार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .
सदर मस्जिद परिचय व ईद मिलन कार्यक्रमाची सुरुवात कुराण पठणाने करण्यात आली या वेळी डी वाय एस पी डॉ धीरज कुमार बच्चू म्हणाले की जमाते इस्लामी हिंद माजलगाव यांचे मी अाभार मानतो की त्यांनी हा सामाजिक सलोख्याचा व शांतीचा संदेश देणारा कार्यक्रम आयोजन करून सर्व धर्मीय बांधवांना आमंत्रित केले मी पहिल्यांदाच अशा सामाजिक कार्यक्रमात आलो मला खूप छान वाटले . आज मुस्लिम समाजाने शिक्षणासाठी अजून पुढाकार घेऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे कारण ” पढ़ने से ही दिमाग की बत्ती जलती है”. असे म्हटले या वेळी उपविभागीय अधिकारी मा.गौरव इंगोले यांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी आपले एक ध्येय निश्चित करून त्यासाठी मेहनत केली पाहिजे ,मुस्लिम समाज रोजगारासाठी चांगली मेहनत घेतो चांगले नियोजन करून माहिती मिळवून उत्तम प्रकारे बिजनेस होऊ शकतो .समाजात सदभावना वाढली पाहिजे त्यामुळे समाजात एकात्मता, बंधूंभाव शांतता वाढण्यास मदत मिळते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस जमाती इस्लामी हिंद माजलगावचे शहराध्यक्ष माजेद खान यांनी प्रास्ताविक करत कार्यक्रमाची रूपरेषा व उद्देश स्पष्ट केले तसेच जमाते इस्लामी हिंद देशभरात करत असलेले समाजसेवेचे कार्य नमूद केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मारुफ इनामदार यांनी केले.