कसं शक्य आहे? 400 वर्षे जुनं पेंटिंग पाहून प्रत्येकाला धक्का; असं यात दिसलं काय?
काही वेळा असं काहीतरी दिसतं किंवा घडतं की त्यावर विश्वास ठेवणं कठीण होतं. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, जो पाहिल्यावर अनेकांचा यावर विश्वास बसत नाही आहे.
हा फोटो 400 वर्षे जुन्या पेंटिंगचा आहे. एका लहान मुलांचं हे पेंटिंग आहे. पण यात असं काहीतरी दिसलं की सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
लंडनच्या गॅलरीत हे पेंटिंग आहे. फियोना फॉस्केट नावाची 57 वर्षीय महिला तिची 23 वर्षांची मुलगी हॉलीसोबत तिथं गेली होती फिओनाने पेंटिंगकडे खूप काळजीपूर्वक पाहिले, तेव्हा तिला यात विचित्र गोष्ट दिसली. गॅलरीत येणाऱ्या लोकांमध्ये हा फोटो खूप लोकप्रिय होत असल्याचे नॅशनल गॅलरीच्या प्रवक्त्याने सांगितलं. तो फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताना त्याने लोकांना विचारले होते की, फोटोत काही आधुनिक गोष्ट दिसतं का?
कुणाचा आहे का फोटो?
माहितीनुसार हा फोटो सतराव्या शतकातील आहे. डच मास्टर फर्डिनांड बोल यांनी काढलेलं हे 8 वर्षांच्या मुलाचं पोर्ट्रेट. मुलाचं नाव फ्रेड्रिक स्ल्यूस्कन असून तो कलाकाराच्या पत्नीचा चुलत भाऊ असल्याचं सांगितलं जातं.
तसं पाहिलं तर हा फोटो सामान्य वाटेल. पण तुम्ही नीट निरखून पाहिलं तर एक अजब गोष्ट तुमच्याही लक्षात येईल. मुलाचे पाय पाहून सर्वांना आश्चर्य वाटतं आहे. लोक याचा संबंध टाइम ट्रॅव्हलशी जोडत आहे. टाइम ट्रॅव्हल म्हणजे भविष्यात किंवा भूतकाळातील प्रवास. ही एक पूर्णपणे अशक्य प्रक्रिया आहे, आजवर तुम्ही अनेक काल्पनिक फिल्ममध्ये पाहिली असेल. आता या फोटोत असं काय आहे, ज्याचा संबंध लोक टाइम ट्रॅव्हलशी जोडत आहेत.
काय आहे या फोटोत?
या मुलाच्या पायाकडे नीट पाहा. मुलाने नायकी कंपनीचे शूझ घातले आहेत. त्याच्या बुटांवर नायकीचा लोगो म्हणजे टिक आहे. Nike कंपनी ही क्रीडा संबंधित वस्तूंची जगातील सर्वात मोठी उत्पादक कंपनी आहे. ज्याची स्थापना 1964 मध्ये अमेरिकेत झाली होती. म्हणजे या कंपनीच्या स्थापनेला आता 60 वर्षे झाली आहेत. मग 400 वर्ष जुन्या पेंटिंगमध्ये नायकीचे बूट कसे दिसतील? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
फियोनानाने एकतर मुलगा किंवा कलाकार टाईम ट्रॅव्हलर होता असा दावा केला आहे. तुम्हाला या फोटोबाबत काय वाटतं