क्राईम

धक्कादायक ! क्रूर पतीने पत्नीच्या मृतदेहाचे का केले 200 हून अधिक तुकडे…


ब्रिटन (Britain) मध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. 28 वर्षीय निकोलस मॅटसनने आपल्या पत्नीची चाकूने भोसकून हत्या (Murder) केली. त्यानंतर तिच्या शरीराचे 200 हून अधिक तुकडे केले.

हे तुकडे प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये पॅक केले आणि नदीत फेकले. गेल्या वर्षी, 25 मार्च 2023 रोजी, 26 वर्षीय होली ब्रॅमली बेपत्ता झाली होती. ब्रॅमलीचा मृतदेह बेपत्ता झाल्यानंतर आठ दिवसांनी लिंकनशायरच्या बासिंघम येथील विथम नदीत सापडला. हत्येनंतर जवळपास वर्षभरानंतर ब्रॅमलीचा पती निकोलस मेटसन याने कोणतेही कारण न देता गुन्ह्याची कबुली दिली.

लिंकनशायर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निकोलस मेटसनने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. तथापि, मेटसनने यापूर्वी पत्नीची हत्या केल्याचा आरोप फेटाळला होता. पोलिसांनी जोशुआ हॅनकॉक या आणखी एका व्यक्तीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॅनकॉकने मेटॅनसला मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात मदत केली होती. हॅनकॉकनेही आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.

तथापी, ब्रिटीश वृत्तपत्र बीबीसीच्या वृत्तानुसार, शुक्रवारी लिंकन क्राउन कोर्टात शिक्षेच्या सुनावणीदरम्यान हे उघड झाले की, हॅनकॉक हा मेटसनचा मित्र आहे आणि त्याने ब्रॅमलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मेटसनकडून काही पैसेही घेतले होते. रिपोर्टनुसार मेटसन हा सवयीचा गुन्हेगार आहे. 2013, 2016 आणि 2017 मध्ये मेटसनला विविध गुन्ह्यांमध्येही दोषी ठरवण्यात आले होते. मात्र, मेटसनने पत्नीची हत्या का केली हे सांगितलेले नाही. मॅटसन आणि ब्रॅमली यांचे 2021 साली लग्न झाले आणि दोघेही घटस्फोटाच्या मार्गावर होते.

कोर्टाच्या सुनावणीदरम्यान, ब्रॅमलीच्या आई आणि बहिणीने मेटसनला ‘दुष्ट राक्षस’ म्हणून वर्णन केले. ब्रॅमलीच्या कुटुंबीयांनी असेही सांगितले की, मेटसनने ब्रॅमलीला जबरदस्ती आणि फसवणूक करून आपल्या जाळ्यात अडकवले होते. यामुळेच त्यांचा विवाह अवघ्या 16 महिन्यांतच तुटला. डेली मेल या दुसऱ्या ब्रिटीश वृत्तपत्राने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, मेटॅनसचा प्राण्यांवर क्रूरतेचा इतिहास आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button