महाविकास आघाडीचे ४८ उमेदवार ठरले, वाचा संपुर्ण यादी, महायुतीला देणार टक्कर
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात महायुती तसेच महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी सुरू केली आहे. राज्यात झालेल्या पक्ष फुटीनंतर राज्यातील राजकीय मताचं गणित बदललं आहे.
यातच आता महाविकास आघाडीसोबत वंचित सोबत आल्याने लोकसभेची ही लढत चांगलीच रंगतदार होण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या बाजूला आता महाविकास आघाडीची संभाव्य यादी समोर आली आहे.
अलिकडेच महाविकास आघाडीची महत्वाची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत लोकसभा जागावाटप झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यात ठाकरे गटाला सर्वाधिक २२ ते २३ जागा मिळण्याची शक्यता आहे. त्याच्या खालोखाल कॉंग्रेसला अठरा जागा तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला एकूण दहा जागा मिळण्याची शक्यता आहे. यातच ठाकरे गटाच्या कोट्यातून वंचितला जागा मिळण्याची शक्यता तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी संघटनेला एक जागा मिळणार आहेत.
दरम्यान, महाविकास आघाडीकडून आता संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे. परभणी लोकसभा मतदारसंघातून संजय जाधव यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर जालना लोकसभा मतदारसंघातून शिवाजीराव चोथे यांना ठाकरे गटाकडूनच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. यातच नाशिक लोकसभा मतदारसंघातून विजय करंजकर यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.
महाविकास आघाडीची सर्व 48 जागांची संभाव्य यादी
रामटेक – रश्मी बर्वे, कुणाल राऊत, किशोर गजभिये, तक्षशिला वागधरे काँग्रेस
बुलढाणा – नरेंद्र खेडेकर शिवसेना ठाकरे गट
यवतमाळ वाशीम – संजय देशमुख शिवसेना ठाकरे गट
हिंगोली – सचिन नाईक काँग्रेस
परभणी – संजय जाधव शिवसेना ठाकरे गट
जालना – शिवाजीराव चोथे शिवसेना ठाकरे गट
संभाजीनगर – चंद्रकांत खैरे शिवसेना ठाकरे गट
नाशिक – विजय करंजकर शिवसेना ठाकरे गट
पालघर – भारती कामडी शिवसेना ठाकरे गट
कल्याण – सुष्मा अंधारे किंवा आदित्य ठाकरे शिवसेना ठाकरे गट
ठाणे – राजन विचारे शिवसेना ठाकरे गट
मुंबई उत्तर पश्चिम – अमोल कीर्तीकर शिवसेना ठाकरे गट
मुंबई दक्षिण – अरविंद सावंत शिवसेना ठाकरे गट
मुंबई ईशान्य – संजय दिना पाटील शिवसेना ठाकरे गट
मुंबई दक्षिण मध्य – अनिल देसाई शिवसेना ठाकरे
रायगड – अनंत गीते शिवसेना ठाकरे गट
रत्नागिरी सिंधुदुर्ग – विनायक राऊत शिवसना ठाकरे गट
मावळ – संजोग वाघेरे शिवसेना ठाकरे गट
शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे शिवसेना ठाकरे गट
धाराशिव – ओमराजे निंबाळकर शिवसेना ठाकरे गट
कोल्हापूर – शिवसेना ठाकरे गट ( शिवसेना ठाकरे गटाकडे ही जागा जरी असली तरी ही जागा छत्रपती शाहू महाराजांना उमेदवारी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडली जाऊ शकते )
हातकणंगले – ( स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी जागा सोडली मात्र अद्याप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मग यामध्ये येण्याची तयारी न दर्शवल्याने ही जागा शिवसेना ठाकरे गटाकडे आहे )
अकोला – प्रकाश आंबडेकर वंचित बहुजन
शिरूर – अमोल कोल्हे राष्ट्रवादी
सातारा – श्रीनिवास पाटील राष्ट्रवादी (मात्र श्रीनिवास पाटील यांच्या नुसार त्यांच्या मुलाला उमेद्वार द्याव – सारंग पाटील)
माढा – लक्ष्मण हाके (संध्या शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते आहे मात्र राष्ट्रवादी चिन्हावर लढणार)
बारामती – सुप्रिया सुळे राष्ट्रवादी
जळगाव – हर्षल माने शिवसेना (राष्ट्रवादी उमेद्वार असेल वेदांतच म्हणणं आहे)
रावेर – एकनाथ खडसे राष्ट्रवादी
दिंडोरी – चिंतामण गावित राष्ट्रवादी
बीड – नरेंद्र काळे राष्ट्रवादी
अहमदनगर – निलेश लंके राष्ट्रवादी
अमरावती – बळवंत वानखेडे आणि राहुल गडपाले काँग्रेस
भंडारा – नाना पटोले काँग्रेस
चंद्रपूर – प्रतिभा धानोरकर आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार काँग्रेस
गडचिरोली – डॉ. नामदेव उसेंडी,डॉ. नामदेव किरसान आणि डॉ. नितीन कोडवते काँग्रेस
नांदेड – आशा शिंदे काँग्रेस
लातूर – अजून नाव ठारलं नाही काँग्रेस
धुळे – तुषार शेवाळे आणि शामकांत सनेर काँग्रेस
नंदुरबार – के सी पाडवी काँग्रेस
पुणे – रविंद्र धनगेकर काँग्रेस
सोलापूर – प्रणिती शिंदे काँग्रेस
सांगली – विशाल पाटील काँग्रेस
मुंबई उत्तर मध्य – काँग्रेस (अजून ठरलं नाही)
मुंबई उत्तर – काँग्रेस (अजून ठरलं नाही)
भिवंडी – दयानंद चोरघे काँग्रेस
वर्धा – हर्षवर्धन देशमुख आणि समीर देशमुख काँग्रेस
नागपूर – अभिजित वंजारी, विशाल मुत्तेमवार, प्रफुल गुडधे काँग्रेस