आरोग्यदेश-विदेश

मोबाईलचा फ्लॅश पडताच समजलं भयानक सत्य,तिच्या पायाखालची जमीनच सरकली


लंडन : तुम्ही मोबाईलच्या कॅमेऱ्यात बरेच फोटो काढले असतील. अशीच एक महिला जिनं आपल्या तीन महिन्यांच्या मुलाचे फोटो काढले. पण मोबाईलचा फ्लॅश मुलाच्या डोळ्यावर पडल्यानंतर त्याला तिचं भयानक सत्य समजलं.

महिलेला आपल्या मुलाचं सत्य समजताच तिच्या पायाखालची जमीनच सरकली. मुलाच्या डोळ्यात असं काही दिसलं की ती हादरलीच.

ब्रिटनमधील ही धक्कादायक घटना आहे. सारा हेजेस असं या महिलेचं नाव आहे. नोव्हेंबर 2022 मधील ही गोष्ट. केंटमध्ये राहणारी 40 वर्षांची सारा घरात स्वयंपाक करत होती. तेव्हा तिची नजर तिचा तीन महिन्यांचा मुलगा थॉमसवर पडली. तिला त्याच्या डोळ्यात एक विचित्र पांढरी चमक दिसत होती. त्याचे डोळे मांजरासारखे दिसत होते. ती घाबरली आणि तिनं लगेच आपल्या स्मार्टफोनचा टॉर्च ऑन केला. तिला मोबाईलच्या चमकत्या प्रकाशात असं काही दिसलं की ती घाबरली.

काही क्षणात चमक नाहीशी झाली. काही वेळानं तिनं पुन्हा स्मार्टफोनचा फ्लॅश चालू केला आणि तिने त्याचे फोटोही काढले. जेणेकरून पुन्हा ती चमक दिसेल. पण ही चमक काही क्षणातच नाहीशी झाली होती. तेव्हा तिला वाटलं की कदाचित ही चमक प्रकाशामुळे आली असावी. पण तिच्या मनात शंका निर्माण झाली. तिनं संपूर्ण प्रकरण समजून घेण्याचा प्रयत्न केला. ती थॉमसला वेगवेगळ्या खोल्यांमध्ये घेऊन फिरत राहिली, वेगवेगळ्या दिव्यांजवळ नेऊन त्याच्याकडे बारकाईने पाहत राहिली. काही वेळाने तिच्या त्याच्या डोळ्यात पुन्हा ती पांढरी चमक दिसली. मग मात्र ती घाबरली.

फोनमुळे महिलेला तिच्या मुलाला असलेला कॅन्सरसारख्या गंभीर आजाराची माहिती झाली.

यानंतर तिनं याबाबत इंटरनेटवर सर्च केलं. लगेच डॉक्टरांशी संपर्क साधला. तिच्या मुलाच्या डोळ्यात दिसणारी चमक म्हणजे कॅन्सर होता. हा डोळ्याचा दुर्मिळ कर्करोग आहे, ज्याला रेटिनोब्लास्टोमा म्हणतात. यामुळे दृष्टी कमी होऊ शकते. हे समजल्यानंतर साराच्या पायाखालची जमीनच सरकली. तिनं मुलावर तातडीने उपचार सुरू केले. नोव्हेंबर 2022 मध्ये 6 वेळा केमोथेरपी करण्यात आली. न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार 10 मे 2023 रोजी डॉक्टरांनी त्याला कॅन्सरमुक्त घोषित केलं.

फोनमुळे महिलेला तिच्या मुलाला असलेला कॅन्सरसारख्या गंभीर आजाराची माहिती झाली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button