राज्य सरकारचा मोठा निर्णय ! महाराष्ट्रातील कोणत्या विद्यार्थिनींना मिळणार दरमहा 5 हजार 300 रुपये
महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील विविध घटकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. राज्यातील महिलांसाठी देखील शासनाने अनेक योजना चालवल्या आहेत.
महिला सक्षमीकरण व्हावे यासाठी केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे सरकार आग्रही आहे. स्त्रियांचे जीवनमान सुधारण्यासाठी, स्त्री शिक्षणाला चालना मिळावी म्हणून शासनाने अनेक योजना सुरू केल्या आहेत.
अशातच आता वर्तमान शिंदे-फडणवीस-पवार सरकारने महाराष्ट्रातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे.
शासनाने राज्यातील मुलींना उच्च शिक्षण घेताना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये आणि मुलींचे उच्च शिक्षण खंडित होऊ नये यासाठी एक मोठी घोषणा केली आहे.
आता राज्यातील मुलींना मोफत उच्च शिक्षण घेता येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील प्रत्येक मुलीला जून २०२४ पासून सर्व शिक्षण मोफत देण्यात येणार आहे.
तसेच ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी वसतिगृह मिळत नाही, त्यांना दरमहा ठराविक रक्कम उपलब्ध करून दिली जाणार आहे.
उच्च शिक्षण घेणाऱ्या ज्या मुलींना शिक्षणासाठी वसतिगृह मिळणार नाही अशा मुलींना दरमहा पाच हजार ३०० रुपये देण्यात येणार आहेत.
तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक मुलीला शिक्षण, प्रवास, राहाणे आणि भोजन मोफत दिले जाणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे.
काल अर्थातच 23 फेब्रुवारी 2024 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात ‘रुसा’ निधीतून उभारलेल्या परदेशातील विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या वसतिगृहाच्या उद्घाटना वेळी चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली आहे. या वस्तीगृहाचे उद्घाटन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले असून या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
एकंदरीत राज्य शासनाच्या निर्णयामुळे आता राज्यातील मुलींना विनाशुल्क उच्च शिक्षण प्राप्त करता येणार आहे. यामुळे स्त्री शिक्षणाला मोठी गती मिळेल आणि महिलांचे सक्षमीकरण होईल अशी आशा व्यक्त होत आहे.