महाराष्ट्राच्या राजकारणात घडतय काय ? भाजपचा बडा नेता राज ठाकरेंच्या भेटीला !
भाजप नेते आशिष शेलार यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.
या भेटीमुळे चर्चेला उधाण आलं आहे. शेलार यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली.
दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली. या भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहेत, मात्र गेल्या अनेक दिवसांपासून मनसे महायुतीत सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू आहे.
या संदर्भात ही चर्चा असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
आशिष शेलार यांनी आज सकाळी राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल दीड तास चर्चा देखील झाली. चर्चा नेमकी कशावर झाली याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. मात्र या भेटीनंतर चर्चेला उधाण आलं आहे.
दरम्यान या भेटीवर मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. युतीबाबतचे सर्व निर्णय राज ठाकरे घेतील असं किल्लेदार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान या भेटीनंतर चर्चेला उधाण आलं आहे, आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. दोघांमध्ये दीड तास चर्चा झाली. दरम्यान यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील अनेकदा राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यानंतर आता आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली.
मनसे निवडणुकीच्या रिंगणात
दरम्यान यावेळी मनसे देखील लोकसभेची निवडणूक लढवणार आहे. त्या दृष्टीनं पक्षाची जोरदार तयारी सुरू आहे. मनसेकडून पुणे, नाशिक या शहरांवर लक्ष केंद्रीय करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी नाशिकचा दौरा केला होता. मनसे देखील लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्यानं राज्यात लोकसभा निवडणुकीत मोठी चूरस निर्माण होण्याची शक्यता आहे.