शिक्षिकेला निर्वस्त्र करून बेदम मारहाण,धक्कादायक घटना
पश्चिम बंगालच्या दक्षिण दिनाजपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. शाळेतील शिक्षिका एका विद्यार्थिनीला ओरडल्यामुळे शिक्षिकेला निर्वस्त्र करून बेदम मारहाण केली आहे. मुलीला ओरडल्यामुळे संतप्त झालेल्या लोकांनी शाळेत घुसून शिक्षिकेला मारहाण करण्यास सुरुवात केली. बराच वेळ हा गदारोळ सुरू होता. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर पोलिसांनी 35 जणांविरुद्ध एफआयआर नोंदवली आहे, तर 4 जणांना अटक केली आहे.
ही घटना हिली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील त्रिमोहिनी प्रताप चंद्र हायस्कूलची आहे, जिथे ही विद्यार्थिनी नववीत शिकते. तीन दिवसांपूर्वी शाळेत शिक्षिका या मुलीला काही कारणावरून ओरडली होती. दुसऱ्या दिवशी मुलीचे कुटुंबीय त्यांच्या काही मित्रांसह शाळेत दाखल झाले. त्यांनी शिक्षिकेशी गैरवर्तन केले. विरोध केल्यावर महिलेला निर्वस्त्र करून बेदम मारहाण करण्यात आली. त्यांनतर या प्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करून त्वरित कारवाई करण्यात आली आहे.
पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालच्या दक्षिण दिनाजपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. शाळेतील शिक्षिका एका विद्यार्थिनीला ओरडल्यामुळे शिक्षिकेला निर्वस्त्र करून बेदम मारहाण केली आहे. मुलीला ओरडल्यामुळे संतप्त झालेल्या लोकांनी शाळेत घुसून शिक्षिकेला मारहाण करण्यास सुरुवात केली. बराच वेळ हा गदारोळ सुरू होता. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर पोलिसांनी 35 जणांविरुद्ध एफआयआर नोंदवली आहे, तर 4 जणांना अटक केली आहे.
ही घटना हिली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील त्रिमोहिनी प्रताप चंद्र हायस्कूलची आहे, जिथे ही विद्यार्थिनी नववीत शिकते. तीन दिवसांपूर्वी शाळेत शिक्षिका या मुलीला काही कारणावरून ओरडली होती. दुसऱ्या दिवशी मुलीचे कुटुंबीय त्यांच्या काही मित्रांसह शाळेत दाखल झाले. त्यांनी शिक्षिकेशी गैरवर्तन केले. विरोध केल्यावर महिलेला निर्वस्त्र करून बेदम मारहाण करण्यात आली. त्यांनतर या प्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करून त्वरित कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी प्रकरण शांत केले. महिला शिक्षिकेसोबत झालेल्या गैरवर्तणुकीमुळे स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या घटनेचा नागरिकांनी रास्ता रोको करून निषेध करत दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे. याप्रकरणी पीडित शिक्षिकेने विद्यार्थिनीला शिस्त लावण्यासाठी तिचे कान ओढून तिला ओरडले असल्याचे सांगण्यात येत आहे.
भाजप खासदार आक्रमक
भाजप खासदार सुकांत मजुमदार यांनी रविवारी संबंधित परिसराला भेट दिली. तसेच महिला शिक्षिकेला मारहाण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मजुमदार म्हणाले, “मीही शिक्षक होतो. अनेक विद्यार्थ्यांना फटकारलेही आहे. अशा क्षुल्लक बाबीवरून कुटुंबीयांसह इतर दोनशे लोकांनी शाळेवर हल्ला केला. मात्र तरीही शाळेच्या मुख्याध्यापकांनी तक्रार न दिल्याचे मला आश्चर्य वाटते. पोलिसांनीही गुन्हा दाखल करण्याची हिंमत दाखवली नाही. लोकांनी आंदोलन करून रास्ता रोको केल्यावर पोलीस जागे झाले.”