Video ट्रकचालकांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून, ट्रकचालकांनी पोलिसांवरच हल्ला चढवला
मुंबई : नवी मुंबईमध्ये ट्रकचालकांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून, ट्रकचालकांनी पोलिसांवरच हल्ला चढवला आहे. एका जमावाने पोलिसावर लाठ्या काठ्याने हल्ला केला आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
केंद्र सरकारने पारित केलेल्या मोटार वाहन कायद्याला देशभरात तीव्र विरोध होत आहे. महाराष्ट्रातही ठिकठिकाणी ट्रकचालकांनी बंद पुकारला आहे. नवी मुंबईजवळच्या महामार्गावर एका पोलिसाला आंदोलकांनी घेरले आणि मारो…मारो पोलिसवाले को मारो, असे म्हणत जमावाने लाठ्या काठ्या हातात घेऊन पोलिसाच्या अंगावर धावून गेले आहे. संतप्त जमावाला पाहून पोलिस कर्मचाऱ्याने आपला जीव वाचवण्यासाठी पळ काढला आहे. संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
उलवे नवी मुंबईतील बेलापूर महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. एनआरआय पोलिसांनी शेकडो ट्रक चालकांना ताब्यात घेतले आहे. तर काही ट्रक चालकांना पनवेल सायन महामार्ग रोखला असून प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. पोलिस त्यांची धडपकड करत आहेत. त्यामुळे ट्रक चालक नवीन कायद्याला विरोध म्हणून आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
ट्रकचालकांचा आंदेलनाला हिंसक वळण, पोलिसाला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल pic.twitter.com/w1sc2hbGOQ
— VIRALबाबा (@viralmedia70) January 1, 2024
दरम्यान, केंद्र सरकारच्या माध्यमातून मोटार वाहन कायदा पारित केला आहे. यानुसार अपघातास जबाबदार ट्रकचालकास सात वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. सोबतच सात लाख रुपये दंड देखील आकाराला जाणार आहे. याच कायद्याला विरोध म्हणून आजपासून महाराष्ट्रासह देश भारतील सर्वच ट्रक चालक संपावर गेले आहेत आहे. आजपासून तीन दिवसांचा संप आहे. त्याचाच परिणाम म्हणून ट्रक चालक रस्त्यावर उतरले आहेत.