गुणरत्न सदावर्तेंना मोठा धक्का! एसटी बँकेतील सत्ता का धोक्यात?
वकिल गुणरत्न सदावर्ते यांना मोठा झटका बसणार आहे. गुणरत्न सदावर्तेंची एसटी बँकेतील सत्ता अडचणीत येण्याची चिन्हे दिसत आहेत.
सदावर्तेंच्या एकाधिकारशाहिला कंटाळून एसटी कर्मचारी बँकेतील 15 संचालक पाठिंबा घेणार काढून घेणार असल्याचा खळबळजनक दावा माजी जिल्हा अध्यक्ष संतोष शिंदे यांनी केला आहे. या संचालकांचा प्रवक्ता म्हणून बाजू मांडत असल्याचेही ते म्हणालेत.
गुणरत्न सदावर्ते यांना बँकेचे मार्गदर्शक म्हणून आम्ही स्वीकारले होते. मात्र ते आता मालक व्हायला चालले आहेत. याला आता एसटी जनसंघाने विरोध दर्शविला असून बँकेचे 19 पैकी 11 संचालक सदावर्ते यांच्या विरोधात एकवटले असल्याची माहिती एसटी कामगार नेते संतोष शिंदे यांनी दिली आहे.
तसेच “गुणरत्न सदावर्ते, जयश्री पाटील आणि त्यांचे मेव्हणे सौरभ पाटील यांच्या वादग्रस्त कारभारावर बोट ठेवत त्यांची लवकरच हकालपट्टी करणार असल्याचेही ते म्हणाले. सदावर्ते यांनी पैसे घेऊन आणि बेकायदेशीर रित्या नोकरभरती केली असून जयश्री पाटील या मनमानी कारभार करत आहेत,” असल्याचा आरोपही यावेळी केला.