बाजारात आलीय डिजिटल पूजेची माळ; VIDEO पाहा
सोशल मीडियावर एक टेक्नॉलॉजी संबंधित व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पूजेची माळ ही चक्क डिजीटल स्वरूपात आली आहे.
पूजा करताना कोणत्याही मंत्राचा जप करताना आपल्याला माळही लागतेच. कधी कधी जप करत असताना आपण कितीवेळा मंत्र जपला आहे हे विसरून जातो. त्यामुळे मंत्रांचा जप करण्यासाठी माळ उपयोगी ठरते.
परंतु व्हायरल व्हिडीओत आपल्याला दिसते की, बाजारात चक्क डिजीटल माळेची मशीन आली आहे. या मशीनद्वारे आता आपल्याला मंत्र जपताना तो कितीवेळा जपला आहे, हो मोजायला मदत मिळणार आहे. व्हिडिओत आपल्याला वेगवेगळ्या रंगातील मशीन दिसत आहे.
माला भी digital – वाह India ! pic.twitter.com/deYY8IdsOq
— Harsh Goenka (@hvgoenka) December 4, 2023
भारतातील प्रसिद्ध उद्योगपतींपैकी एक असलेल्या हर्ष गोएंका यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे. हर्ष गोएंका हे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. तसेच त्यांनी केलेल्या अनेक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. व्हिडिओ पोस्ट करत गोयंका यांनी कॅप्शनमध्ये लिहिल आहे की, माळ पण डिजिटल-वाह इंडिया!”.