ताज्या बातम्या

सीटी स्कॅन पाहून डॉक्टर हैराण; म्हणाले – तू जिवंत कसा?


उपचारांदरम्यान डॉक्टरांना अशा अशा केसेस बघायला मिळतात की, ते हैराण होतात. लोक अशा अशा समस्या घेऊन येतात की, डॉक्टरांनाही प्रश्न पडतो की, हे लोक जिवंत कसे आहेत? व्हिएतनाममधून अशीच एक घटना समोर आली आहे.

5 महिन्यांपासून डोकेदुखी आणि डोळ्यांची दृष्टी कमी, नाकातून अजब पाणी येत असल्याची समस्या घेऊन एक व्यक्ती डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांना आधी चेक तेव्हा काही समजलं नाही. नंतर त्याचं सीटी स्कॅन करण्यात आलं. सीटी स्कॅनमधून जो खुलासा झाला तो धक्का देणारा होता. या व्यक्तीच्या नाकात काहीतरी होतं जे त्याच्या डोळ्यांपर्यंत पोहोचलं होतं. हे दुसरं काही नाही तर चॉपस्टिकचे दोन तुकडे होते. ही व्यक्ती व्हिएतनामच्या डांग होईमध्ये क्यूबा फ्रेन्डशिप हॉस्पिटलमध्ये पोहोचली होती. इथे हा खुलासा झाला. हे पाहून हैराण झालेल्या डॉक्टरांनी त्याला विचारलं, तू जिवंत कसा आहे?

डॉक्टरांनी त्याला याबाबत विचारलं तर आधी त्याने काही सांगितलं नाही. पण नंतर तो म्हणाला की, काही महिन्यांआधी नशेत असताना त्याचं काही लोकांसोबत भांडण झालं होतं. बरीच हाणामारी झाली हती. ज्यानंतर जखमी अवस्थेत तो हॉस्पिटलमध्ये पोहोचला होता. डॉक्टरांनी त्याला मलम पट्टी करून परत पाठवलं. आता त्याला आठवत आहे की, भांडण करत असताना त्या लोकांपैकी एकाने त्याच्या नाकात चॉपस्टिक घुसवली होती.

चर्चा आणि विचार केल्यावर डॉक्टरांनी नाकात एंडोस्कोपिक करण्याचा निर्णय घेतला. ज्यात मायक्रोसर्जरीच्या माध्यमातून नाकीतील चॉपस्टिकचे तुकडे काढण्यात आले. आता रूग्णाची स्थिती स्थिर आहे आणि त्याला घरी पाठवण्यात आलं आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button