अवकाळी पावसाने मराठवाड्याला झोडपले ! ‘जाणून घ्या’ कुठे झाला पाऊस
पाणी टंचाईनेग्रस्त (Water issue) असलेल्या मराठवाड्यातील किमान सहा जिल्हांना अवकाळी पावसाने (awkali paus) चांगलेच झोडपले.जालन्यात सर्वाधिक 132.25 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि बीडमधील १०७ महसूल मंडळांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. जालना येथील बदनापूर तालुक्यातील वाघरूळ महसूल मंडळात सर्वाधिक १३२.२५ मिमी पावसाची नोंद झाली. (Heavy rain))
हिंगोली येथे पावसाशी संबंधित घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला.रविवारी सायंकाळपासून सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत छत्रपती संभाजीनगरमधील ३२, जालन्यातील २७, परभणीतील २३, नांदेड आणि हिंगोलीतील प्रत्येकी १२ आणि बीडमधील एका मंडळात ६५ मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.हा पाऊस झाला असला तरी पाणी टंचाईच्या झळा कमी होण्याची शक्यता नाही.