रजनीगंधा शेतीतून ऊसाच्या शेतीपेक्षा जास्त नफा,शेतकऱ्यांना सरकार 24,000 रुपयांचे अनुदान
गेल्या काही वर्षांत रजनीगंधा (Rajnigandha Farming) या फुलांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. भारतातून थायलंडलाही ही फुले पुरवली जात आहेत. बाजारात अनेक प्रकारची फुले विकली जात आहेत. फुलांना चांगला दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांना फायदा होत आहे. सरकारकडून नवीन शेतकऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात येत आहे. जेणेकरून रजनीगंधा फुलांच्या लागवडीत आणखी वाढ होईल. जेणेकरुन जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळेल. प्रत्येक राज्यातील शेतकर्यांसाठी हेल्पलाइन क्रमांकही जारी केले जातात. जेणेकरुन या शेतीशी संबंधित कोणाला काही समस्या किंवा प्रश्न असल्यास त्यांना त्याची उत्तरे मिळू शकतील.
उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील अनेक शेतकरी प्रामुख्यानं ऊसाची लागवड करतात. कारण हे पीक नगदी आहे. पण अनेक शेतकरी आता रजनीगंधा फुलाची शेती करत आहेत. ही शेती करुन तुम्ही ऊसाच्या पिकापेक्षआ जास्त नफा मिळवू शकता. रजनीगंधा शेती लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार 24,000 रुपयांचे अनुदान देते. हरियाणातील अनेक शेतकरी गहू, धान आणि इतर पिकांच्या लागवडीपेक्षा फुलांची लागवड करून अधिक नफा कमावत आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांना दररोज वीस ते तीस हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. दरम्यान, परदेशातही या फुलांच्या मागणीत वाढ होत आहे. त्यामुळं रजनीगंधाच्या फुलांना सध्या चांगली किंमत मिळत आहे.
गेल्या काही वर्षांत परदेशातही या फउलांच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. भारतातून थायलंडलाही या फुलांचा पुरवठा होत आहे. बाजारात अनेक प्रकारच्या फुलांची विक्री होत आहे. हलकी आणि चांगल्या प्रतीची फुले वेगळी केली जातात. ज्यामध्ये रजनीगंधाच्या फुलांना मोठी मागणी आहे.
सध्या देशातील शेतकऱ्यांना विविध संकटाचा सामना करावा लागत आहे. कधी अस्मानी तर कधी सुलताना संकट येत आहेत. पण काही शेतकरी या संकटांवर मात करुनही भरघोश उत्पन्न घेत एक आदर्श निर्माण करत आहेत. अलीकडच्या काळात शेतकरी पारंपारीक शेती न करता आधुनिक पध्दतीनं शेती करत आहेत. त्यातून चांगला नफा मिळवत आहे.