देश-विदेश

चीनमध्ये पसरणाऱ्या नवीन व्हायरसवर सरकारची योजना तयार? भारतीयांना किती आहे धोका?


चीनमध्ये पुन्हा एका नवीन व्हायरसने शिरकाव केला आहे. यामुळे पुन्हा कोरोना व्हायरस सारखी परिस्थिती निर्माण होणार का? अशी चिंता जगभरातील देशांना पडली आहे. या व्हायरसचा परिणाम भारतातील नागरिकनांवरही होणार का, यासाठी सरकारने काय तयारी केली आहे?

याची माहिती आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की, ते उत्तर चीनमधील मुलांमध्ये श्वसनाचे आजार आणि H9N2 संसर्गाच्या प्रकरणांवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. मंत्रालयाने म्हटले आहे की, चीनमध्ये नोंदवलेल्या एव्हीयन इन्फ्लूएंझा आणि श्वसनाच्या आजारांचा भारताला कमी धोका आहे.

आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की, चीनमधील इन्फ्लूएंझा परिस्थितीमुळे उद्भवू शकणाऱ्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारत तयार आहे. काही माध्यमांनी उत्तर चीनमधील मुलांमध्ये श्वसनाचे आजार आढळून आल्याचं वृत्त दिलं आहे. या संदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) एक निवेदन जारी केले आहे.

मंत्रालयाने सांगितले की, नुकतीच आरोग्य सेवा महासंचालनालयाच्या नेतृत्वाखाली एक बैठक झाली. ऑक्टोबर महिन्यात चीनमध्ये H9N2 ची (एव्हीयन इन्फ्लूएंझा व्हायरस) लागण झालेल्या एका व्यक्तीच्या प्रकरणाबाबत WHO ला दिलेल्या माहितीच्या पार्श्वभूमीवर भारतातील एव्हीयन इन्फ्लूएंझावर चर्चा करण्यात आली. यासाठी आवश्यक पावले उचलण्याबाबत चर्चा करण्यात आली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button