दोन मुलांच्या आईचे प्रेमसंबंध;नवऱ्याला सोडून प्रियकरासोबत लगीनगाठ
विवाहित महिलेने आपल्या दोन मुलांना आणि नवऱ्याला सोडून प्रियकरासोबत लगीनगाठ बांधली. ही घटना बेगूसरायच्या भगवानपूर घडलीय. या घटनेमुळे सर्व गावात मोठी चर्चा सुरू झालीय.
विवाहितेच्या पतीला पत्नीचं प्रेम प्रकरण माहिती झाल्यानंतर त्याने तिचं लग्न प्रियकरासोबत लावून दिलं. पण या घटनेत काही गोष्टी चित्रपटापेक्षा अधिकच्या झाल्या आहेत. यामुळे या प्रकरणाची चर्चा अख्या गावात सुरूय. मिळालेल्या माहितीनुसार, मन्सूरचक पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या काजल नावाच्या मुलीचं लग्न दहिया गावातील राजेशशी झाला होता.
या दोघांना दोन मुलंही आहेत. दोघाचा संसार सुरू होता, परंतु पत्नी काजलचे तिच्या माहेरील राजू नावाच्या मुलाशी प्रेमप्रकरण सुरू होतं. तिच्या लग्नाच्या आधीपासून या दोघांचे प्रेमप्रकरण सुरू होतं. काजलला दोन मुलं झाल्यानंतरही ते दोघे संपर्कात होते. काजलला भेटण्यासाठी प्रियकर राजू हा तिच्या सासरी यायचा. दोघेही गुपचूप भेटत असायचे. सोमवारीही प्रियकर काजलला भेटण्यासाठी आला होता. काजलच्या सासरच्या मंडळींनी या दोघांना रंगेहाथ पकडलं.
त्यांनी काजलच्या प्रियकराला पकडलं. त्याची विचारणा केली. लग्नाच्या आधीपासून त्यांचे प्रेमसंबंध होते, असे प्रियकराने सांगितले. त्यानंतर काजलचं प्रेम प्रकरण सर्वांसमोर आलं . काजलाच्या नवऱ्याला तिच्या प्रेमप्रकरणाविषयी माहिती झाली. सर्व गावात काजलच्या प्रेम प्रकरणाचा विषय चालू होता. यानंतर काजलच्या नवऱ्यानं मोठा निर्णय घेतला. पत्नीचं प्रियकरासोबत लावण्याचा निर्णय घेतला.
राजू आणि काजलंचं लग्न नातेवाईकांच्या उपस्थितीत लावून दिलं. गावातील सरपंच आणि गावातील इतर नागरिकांच्या उपस्थितीत हे लग्न पार पडलं. हा विवाह सोहळा पाहण्यासाठी गावातील मंदिरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.