श्रीलंकेत संतापलेल्या जनतेचा थेट राष्ट्रपती भवनावरच हल्ला,राष्ट्रपती राजपक्षे यांचे पलयन
कोलंबो : श्रीलंकेतील आर्थिक संकटामुळे संतापलेल्या जनतेने थेट राष्ट्रपती भवनावरच हल्लाबोल केला. हजारोंच्या संख्येने श्रीलंकन नागरिक राष्ट्रपती भवनाचे दार तोडून आत पोहचले.
दरम्यानच्या राष्ट्रपती राजपक्षे यांनी दुसऱ्या देशात पलवायन केल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रपतींनी पलायन केल्यानंतर परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न करीत असलेले पंतप्रधान रनील विक्रमसिंघे यांनीही राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती भवन आणि राजधानीतील सरकारी कार्यालयांसमोर मोठ्या प्रमाणात आंदोलक जमा झाले आहेत.
श्रीलंकेत सरकारच्या विरोधातील उद्रेक रस्त्यांवर पाहायला मिळतो आहे. संतापलल्या लोकांनी राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानावर हल्ला करत, राष्ट्रपती भवन ताब्यात घेतले आहे. घरात आतपर्यंत नागरिक पोहचल्यानंतर, राष्ट्रपती तिथून निघाले असल्याची माहिती आहे. राष्टपती राजपक्षे हे देश सोडून पळून गेल्याचीही माहिती आहे. देशात कधीही आणीबाणी म्हणजेच मार्शल लॉ लागू करण्यात येऊ शकतो, असे सांगण्यात येते आहे