सर्वात मुस्लिमबहूल देश,हिंदूंची संख्या केवळ 3 टक्के ,त्यांच्या चलनी नोटांवर गणेशाची प्रतिमा ..
जकार्ता : आपण आजवर गणेशाची प्रतिमा एखाद्या नोटेवर पाहिली आहे का? कदाचित पाहिली नसेलही; पण जगभरात एकमेव देश असाही आहे, ज्या देशात त्यांच्या चलनी नोटांवर गणेशाची प्रतिमा विराजमान आहे अन् हा देश आहे इंडोनेशिया!
खरं तर हा जगभरातील सर्वात मुस्लिमबहूल देश. मात्र, यानंतरही येथे चलनी नोटांवर गणेशाची प्रतिमा दिसून येते अन् म्हणूनच असे असतानाही नोटांवर गणेशाची प्रतिमा कशी विराजमान आहे, हे पाहणे रंजक ठरते.
इंडोनेशियाचे चलन भारतीय चलनाप्रमाणेच आहे. तेथेही रुपयाचे चलन चालते. इंडोनेशियात जवळपास 87.5 टक्के लोक इस्लाम धर्म मानतात. तेथे हिंदूंची संख्या केवळ 3 टक्के आहे. पण तरीही तेथे 20 हजारांच्या नोटेवर गणेशाची प्रतिमा आहे. ही नोट इंडोनेशियन सरकारने 1998 मध्ये जारी केली होती.
इंडोनेशियात 20 हजारांच्या नोटेवर समोरील बाजूला गणेशाचे छायाचित्र आहे तर मागील बाजूला क्लासरूमचे छायाचित्र आहे. त्यात शिक्षक व विद्यार्थी दिसून येतात. याचबरोबर इंडोनेशियाचे पहिले शिक्षणमंत्री हजर देवांत्रा यांचे छायाचित्रही अंतर्भूत आहे. देवांत्रा इंडोनेशियाचे स्वातंत्र्यसैनिकही राहिले आहेत.
गणेशाला इंडोनेशियात शिक्षण, कला व विज्ञानातील देवता मानले जाते. गणेशामुळेच अर्थव्यवस्था मजबूत आहे, असे त्या देशातील लोकांना वाटते. त्यामुळे, या नोटेवर गणेशाची प्रतिमा विराजमान आहे. सध्या ही 20 हजारांची नोट चलनेत नाही. मात्र, याच देशात 50 हजारांची नोट चलनेत आहे आणि त्यावर बाली मंदिराचा फोटो समाविष्ट आहे.