G20 नंतर सर्वात लोकप्रिय जागतिक नेत्यांमध्ये अव्वलस्थानी कोण? कोणाला किती रेटिंग ?
मुंबई : भारतात झालेल्या G-20 शिखर परिषदेनंतर जगभरात भारताकडून करण्यात आलेल्या आयोजनाची चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताने जी-20 देशांचं अध्यक्षपद भूषवलं. सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे जी-2o यशस्वी झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे देखील आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांच्या यादीत अव्वल आहेत. जागतिक नेते आणि इतर राष्ट्रांचे प्रमुख देखील पंतप्रधान मोदी यांंना भेटण्यासाठी उत्सूक होते. यावरुन असे दिसते की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दबदबा आजही कायम आहे.
भारताचे पंतप्रधान मोदी यांनी सर्वाधिक 76 टक्के रेटिंग मिळाली असून ते अव्वल स्थानी कायम आहेत. मॉर्निंग कन्सल्ट या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात ही आकडेवारी समोर आली आहे. G-2o नंतर मोदींच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी अव्वल स्थानी
मॉर्निंग कन्सल्टच्या सर्वेक्षणात असे दिसून आले की, 76 टक्के लोकांना आज पंतप्रधान मोदी सर्वाधिक प्रभावी वाटतात. लोकप्रियतेच्या यादीत केवळ तीन जागतिक नेत्यांना 50 टक्के रेटिंग मिळाले आहे. स्वित्झर्लंडचे एलेन बारसेट यांना 64 टक्के रेटिंग तर मेक्सिकोचे आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर यांना 61 टक्के रेटिंग मिळाली आहे.
कोणाला किती रेटिंग
ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला दा सिल्वा यांना 49 टक्क्यासह चौथ्या स्थानी, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज 48 टक्केसह पाचव्या स्थानी तर इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी 42 टक्के मतांसह सहाव्या स्थानावर आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांना 40 टक्के, स्पेनचे अध्यक्ष पेड्रो सांचेझ यांना 39 टक्के, आयर्लंडचे लिया वराडकर यांना 38 टक्के, कॅनडाचे जस्टिन ट्रुडो यांना 37 टक्के, बेल्जियमचे अलेक्झांडर डी क्रो यांना 34 टक्के, पोलंडचे मॅट्युझ मोराविकी आणि स्वीडनचे अका क्रिस्टन यांना 32 टक्के मते मिळाली आहेत.
नॉर्वेचे जोनास गार स्टोअर, पीएम ऋषी सुनक आणि ऑस्ट्रियाचे कार्ल नेहॅमर यांना 27 टक्के रेटिंग मिळाले आहे. जर्मनीच्या ओलाफ स्कोल्झ आणि जपानच्या फुमियो किशिदा यांना 25-25 टक्के रेटिंग मिळाले आहे. तर फ्रान्सचे इमॅन्युएल मॅक्रॉन आणि नेदरलँडचे मार्क रुटे यांना 24 टक्के रेटिंग मिळाले आहे. चेक रिपब्लिकच्या पेत्र फियाला आणि दक्षिण कोरियाच्या युन-सेओक-येओल यांना 20-20 टक्के रेटिंग मिळाले आहे.
2019 पासून सर्वेक्षण
मॉर्निंग कन्सल्ट ऑगस्ट 2019 पासून ग्लोबल लीडरशिप अप्रूव्हल प्रोजेक्टवर काम करत आहे. सर्वेक्षणानुसार 2019 पासून पीएम मोदींनी सातत्याने 71% पेक्षा जास्त मान्यता रेटिंग राखली आहे. 2022 पासून, पंतप्रधान मोदींना 75% पेक्षा जास्त रेटिंग मिळाले आहे.