कोंब असलेला मुळव्याधचा त्रास 3 दिवसात होईल गायब, करा हा प्रभावी उपाय
सध्याच्या काळात अनेकांना मुळव्याधच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. अनियोजित जीवनशैली आणि बदललेली आहार पद्धत हे या समस्येचे प्रमुख कारण मानले जाते. पूर्वी वय जास्त असलेल्या लोकांना हा आजार उद्भवत होता, परंतु आता तरुणांमध्ये देखील हा आजार वाढतोय.
अतिशय संवेदनशील ठिकाणी होणाऱ्या या दुखण्यामुळे तीव्र आणि असह्य वेदना होतात. तसेच हा आजार खासगी ठिकाणी होतो, त्यामुळे अनेक जण त्याची वाच्यता करत नाहीत आणि त्रास सहन करत राहतात. मात्र आज आम्ही तुम्हाला यावर एक प्रभावी उपाय सांगणार आहोत.
मूळव्याध कशामुळे होतो?
मूळव्याध या आजाराचा थेट संबंध तुमच्या पचनक्रियेशी आहे. तुम्हाला दीर्घकालीन बद्धकोष्ठतेची किंवा अपचनाची समस्या असेल तर हा आजार उद्भवतो. आतड्यांसंबंधी हालचाल करताना ताणतणाव आणि शौचालयात दीर्घकाळ बसणे ही देखील या आजाराची कारणे आहेत.
मूळव्याध झाल्यानतंर काय त्रास होतो?
मूळव्याध झाल्यानंतर गुदद्वाराच्या कालव्यात कोंब येतो किंवा तेथून मलविसर्जन करताना रक्त पडते. बद्धकोष्ठता या त्रासांमध्ये भर घालते. कारण मलविसर्जनाच्या वेळी ताण पडल्याने गुदद्वाराच्या कालव्यामध्ये दाब वाढतो आणि मूळव्याधीचा कोंब किंवा स्नायूंना धक्का बसतो. यामुळे तीव्र वेदना होतात आणि रक्त ही पडू लागते.
दोन प्रकारचे असतात मूळव्याध
अंतर्गत मूळव्याध आणि बाह्य मूळव्याध असे दोन प्रकार असतात. यातील अंतर्गत मूळव्याध हा खालच्या गुदाशयात होतो आणि बाह्य मूळव्याध बा गुदाभोवती त्वचेखाली विकसित होतो. बाह्य मूळव्याध सर्वात त्रासदायक असतो. कारण बाह्य मूळव्याधमध्ये रक्ताची गुठळी तयार होते आणि त्याच्या वेदना अचानक होता आणि खूप तीव्र असतात. या प्रकारात तुम्हाला तुम्हाला गुदद्वाराभोवती गुठळी जाणवू शकते किंवा दिसू शकते. ही गुठळी सहसा विरघळते.
अंतर्गत मूळव्याधचा विचार केला तर हे वेदनारहित असतात परंतु या प्रकारात मलविसर्जनावेळी मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होतो. हा मूळव्याध झाल्यानंतर तुम्हाला टॉयलेट पेपरवर किंवा टॉयलेट बाऊलमध्ये रक्तही दिसेल. अंतर्गत मूळव्याध गुदद्वाराच्या आतल्या बाजूला होतो. त्यामुळे तो अधिक त्रासदायक आणि चिडचिड वाढवणारा असतो. हा मूळव्याध उद्भवतो तेव्हा मलविसर्जनावेळी गुदद्वाराातून श्लेष्मासमान पदार्थ आणि रक्ताच्या गुठळ्या पडल्याचे तुम्हाला जाणवू शकते. यामुळे खाज सुटण्यासारखी समस्याही उद्भवते.
कोंब मुळव्याध म्हणजे काय?
कोंब मूळव्याध हा गुदद्वाराच्या बाह्य बाजूला होणारा मुळव्याध असतो. हा मूळव्याध बाह्य भागावर होत असल्याने त्याचा त्रास सतत जाणवत असतो. गुदद्वाराच्या आतील भागात झालेला मूळव्याधचा त्रास कधीतरीच होतो. परंतु बाह्य भागावर तयार झालेली गुठळी त्यावर ताण पडल्यास त्रास देऊ लागते. अशावेळी तुम्हाला उठता-बसता त्रास होऊ शकतो. हा मूळव्याध सतत ताण वाढत गेल्यास असह्य होतात.
कोंब मुळव्याधवर घरगुती प्रभावी उपाय?
कोंब किंवा बाह्य मुळव्याधीवर तुम्ही घरीच उपाय करू शकता. यासाठी तुम्हाला खूप खर्च देखील करायची गरज नाही. तुमच्या किचनमध्ये असलेले दोन पदार्थ तुमचा त्रास तीन दिवसात कमी करू शकतात. यासाठी तुम्हाला लिंबू आणि सेंधा मीठ या दोनच वस्तू हव्या आहेत. सेंधा मीठ हे कोणत्याही किराणा दुकानावर सहज उपलब्ध होईल. हा उपाय करण्यासाठी लिंबू अर्ध कापून घ्या आणि त्याच्या एका भागावर चिमुठभर सेंधा मीठ टाका. यानंतर ते लिंबू दातात धरून मीठासकट त्यातील पाणी ओढून पिऊन घ्या. लिंबूमधील पूर्ण रस सेंधा मीठासह चोखून घ्या.
हा उपाय करताना लक्षात ठेवा या गोष्टी
हे लक्षात ठेवा की हा उपाय तुम्हाला दिवसातून दोन वेळा करायचा आहे. एक सकाळी अनासी पोटी म्हणजेच सकाळी उठल्या उठल्या रिकाम्या पोटी हा उपाय करा आणि दुसरी वेळ म्हणजे रात्री झोपताना, जेव्हा तुम्ही काही खाणार पिणार नसाल तेव्हा हा उपाय करा. सलग तीन दिवस हा उपाय केल्याने तुम्हाला मुळव्याधच्या त्रासापासून आराम मिळेल. परंतु सलग नऊ दिवस तुम्ही हा उपाय केला तर तुमचा मुळव्याधचा त्रास कायमचा निघून जाईल. हा नैसर्गिक उपाय आहे, त्यामुळे तो वर दिलेल्या विधीप्रमाणे केला तर त्याचे दुष्परिणाम होत नाही.
टीप – या लेखात दिलेली माहिती ही उपलब्ध स्त्रोतांवर आधारित आहे. नवगण न्युज या माहितीचे समर्थन करत नाही. प्रत्येकाची शारीरिक स्थिती वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करून पाहण्याआधी संबंधित आरोग्य तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.