पुरंदर नागरी सुविधा केंद्रात नागरीकांची होणारी आर्थिक लूट न थांबविल्यास आंदोलन
पुरंदर नागरी सुविधा केंद्रात नागरीकांची होणारी आर्थिक लूट न थांबविल्यास आंदोलन करु,
रिपाइं नेते विष्णूदादा भोसले यांचा महसुल प्रशासन इशारा,
सासवड : पुरंदर तहसिलदार कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रात नागरीकांची आर्थिक लूट करण्यात. येत असून, सदर केंद्रातील कर्मचारी यांच्याकडून , विविध दाखले काढण्यासाठी, शासनाने निश्चित केलेल्या दरा ऐवजी , अवाजवी पैसे घेऊन ,नागरीकांची आर्थिक लूट केली जातेय , अशा अवाजवी व अवास्तव लूट करणाऱ्या संबंधीतावर तात्काळ कारवाई न केल्यास आंदोलन करु, असा इशारा पुरंदर तालुक्याचे तहसिलदार मा. विक्रम राजपूत यांच्याकडे , रिपाइं नेते तथा रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष विष्णूदादा भोसले यांनी दिला आहे. दि. १८ / ८ / २०२३ रोजी
तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुरंदर तहसिलदार कार्यालयात सुरु असलेले नागरीसुविधा केंद्र कोणती एजन्सी चालवते सदर एजन्सीने नाव काय, याबाबत नागरी सेवा केंद्रात कसलाही माहिती फलक लावलेला नाही, या केंद्रात विविध दाखले काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, तसेच बसण्यासाठी बाके नाहीत, जातीचे दाखले रहिवास प्रमाणपत्र, E. W. S. प्रमाणपत्र, उत्पन्नाचे दाखले, विविध प्रकारचे प्रतिज्ञापत्र, यासाठी शासनाने निश्चित केलेले दरपत्रक यांचे सदर नागरी सुविधा केंद्रात माहिती फलक नाहीत त्यामुळे दामदुप्पट किंवा त्यापेक्षा अधिक पैसे उकळून , नागरीसुविधा केंद्र तालूक्यातील जनतेचे आर्थिक शोषण करीत आहे, या केंद्रात सद्यस्थितीत साधे प्रतिज्ञापत्र ६० रुपये, उत्पनाचा दाखला १०० रुपये, जातीचा दाखला १५० रुपये , वारस नोंद प्रतिज्ञापत्र १२० रुपये, E.W. S. प्रमाणपत्र ,१५० रुपये, इतर सर्व दाखले १५० रुपये या प्रमाणे, विविध दाखले काढण्यासाठी पैसे घेऊन, नागरीकांची आर्थिक लूट केली जातेय, त्यामुळे अवास्तव पैसे उकळून नागरीकांची आर्थिक लूट करणाऱ्या संबंधीतावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी, रिपाइं नेते विष्णूदादा भोसले यांनी तहसिलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. अन्यथा पुरंदर तालुक्यातील जनतेच्या न्याय हक्कासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले संलग्न रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडच्या वतीने, आंदोलन करण्यात येईल असा इशारा भोसले यांनी दिला आहे.