आशिया चषकातून सॅमसनचा पत्ता टक? ‘या’ तारखेळा संघ घोषित होण्याची शक्यता
भारतीय संघाचा गुणवंत फलंदाज अशी ओळख असणाऱ्या संजू सॅमसन याच्याबाबत मोठी बातमी समोर येत आहे. आगामी आशिया चषक 30 ऑगस्ट रोजी सुरू होणार आहे. नुकताच भारतीय संघाचा वेस्ट इंडीज दौरा संपन्न झाला.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारताला पराभव स्वीकारावा लागला. सॅमसन देखील या मालिकेत सुमार खेळी करताना दिसला होता. याच पार्श्वभूमीवर सॅमसन आता आशिया चषकासाठी संघात स्थान बनवू शकणार नाही, असे सांगितेल जात आहे.
वेस्ट इंडीज दौऱ्यात भारती संघाने कसोटी आणि वनडे मालिका जिंकली. मात्र, टी-20 मालिका भारताला जिंकता आली नाही. हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने या मालिकेत 3-2 असा पराभव स्वीकारला. संजू सॅमसन वनडे आणि टी-20 मालिकेचा भाग होता. एकूण पाच सामन्यांमध्ये त्याला संधी दिली गेली आणि त्यापैकी एका सामन्यात त्यान अर्धशतक केले. इतर चार सामन्यांमध्ये सॅमसन अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाही. आता याच पार्श्वभूमीवर त्याला आशिया चषक संघात निवड न होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
सूत्राच्या हवाल्याने माध्यमांमध्ये सांगितले जात आहे की, “यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन याला आशिया चषकासाठीच्या 15 सदस्यीय संघातून वगळले जाऊ शकते.” आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा 20 ऑगस्ट रोजी होऊ शकते. असेही सांगितले जात आहे की, अजित अगरकर यांच्या नेतृत्वातील निवड समिती सध्या फक्त आशिया चषकासाठी संघ घोषित करू शकते. वनडे विश्वचषकाची सुरुवात 5 ऑक्टोबर रोज होणार आहे. 5 सप्टेंबरपर्यंत विश्वचषकासाठी सर्व संघांना आफल्या खेळाडूंची नावे घोषित करायची आहेत. अशात विश्वचषकासाठीचा संघ निवड समिती काही दिवासंनी करू शकते.
दरम्यान, आशिया चषकात रिषभ पंत आणि केएल राहुल दुखापतीमुळे खेळू शकणार नाहीत. अशात सॅमसनच्या आधी ईशान किशनला यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संघात स्थान मिळू शकते.
विश्वचषकासाठी बॉटिंग ऑर्डर बदला! रोहित-विराटने ‘या’ क्रमांकावर खेळलं पाहिजे, शास्त्रींचा सल्ला
मोठी बातमी: वेस्ट इंडीजचा दिग्गज भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात दोषी! लवकरच सुनावली जाणार शिक्षा