बीड : शरद पवार गुरुवारी बदामराव पंडित यांच्या निवासस्थानी भेट देणार
गेवराई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे आज बीड दौऱ्यावर येणार असून, सकाळी साडेआठ वाजता गेवराई येथे माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या निवासस्थानी ते सदिच्छा भेट देणार आहेत.
याप्रसंगी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व शिवसैनिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना जिल्हा समन्वयक युधाजीत पंडित यांनी केले आहे.
राज्यात सत्तांतर आणि राष्ट्रवादी काँग्रेसची उभी फुटून मोठी राजकीय घडामोड घडल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे बीड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. दुपारी त्यांची बीड येथे जाहीर सभा होणार आहे. तत्पूर्वी सकाळी साडेआठ वाजता शरद पवार हे गेवराई विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे नेते तथा शिवसेना राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देणार आहेत.