एमपीएसी’ला बसलात? तुमची परीक्षा कधी ते बघा!
कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून २०२३ मध्ये ‘एमपीएससी’कडून घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर झाले आहे. प्राथमिक, मुख्य परीक्षांच्या तारखा आयोगाने अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केल्या आहेत.
या वेळापत्रकानुसार, एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षा ३० सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत होणार आहे.
हे आहे एमपीएससी परीक्षांचे वेळापत्रक
राज्यसेवा : ३३ संवर्गासाठी परीक्षा ३० सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर २०२३ पर्यंत. निकाल – जानेवारी २०२४
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२३ : १४ ऑक्टोबर २०२३ रोजी. निकाल – डिसेंबर २०२३
सहायक कार्यकारी अभियंता गट – अ (स्थापत्य) – १४ ऑक्टोबर, निकाल – डिसेंबर २०२३
महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा – १५ ऑक्टोबर, निकाल – डिसेंबर २०२३
कृषी सेवा मुख्य परीक्षा – १५ ऑक्टोबर, निकाल – डिसेंबर २०२३
सहायक नियंत्रक वैधमापनशास्त्र मुख्य परीक्षा २१ ऑक्टोबर, निकाल – डिसेंबर २०२३
अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा २८ ऑक्टोबर, निकाल – डिसेंबर २०२३