
मुंबईतील लालबाग काळाचौकी(Lalbaug Kalachowki) परिसरात मुंबईला हादरवून सोडणारी घटना घडली आहे. एका तरुणीला रस्त्यात बेदम मारहाण करून तीच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला, या तरुणीने स्वतःचा बचाव करण्यासाठी जवळ असलेल्या नर्सिग होममध्ये शिरली, तरुणाने नर्सिंग होम(Nursing home) मध्ये घुसून तिच्यावर जीवघेणा हल्ला करून स्वतःचा गळा चिरला.
या घटनेनंतर या दोघांना तात्काळ उपचारासाठी केईएम रुग्णालयात (KEM Hospital) पाठविण्यात आले आहे. काळाचौकी पोलीस आणि परिमंडळ ४च्या पोलीस उपायुक्त घटनास्थळी दाखल झाले आहेत. (Mumbai Crime)
मुंबईतील चिंचपोकळी काळाचौकी येथील दत्ताराम लाड मार्गावर (Dattaram Lad Marg) शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास काळाचौकी पोलीस ठाण्याच्या दिशेहून चिंचपोकळी स्थानकाच्या दिशेने एक तरुण आणि तरुणी जात होते, तरुणीसोबत असलेला तरुण तिच्यावर भररस्त्यात चाकूने हल्ला करीत होता, ती स्वतःचा जीव वाचवत धावत धावत एका नर्सिग होम मध्ये शिरली, हा तरुण तिच्यापाठोपाठ नर्सिंग होम मध्ये शिरला, तिथे त्याने तरुणीवर चाकूने हल्ला केला. स्थानिकांनी तरुणाला अडविण्याचा प्रयत्न केला असता या तरुणाने स्वतःचा गळा चिरला. (Mumbai Crime)
या दोघांना तात्काळ परळच्या केईएम रुग्णालयात पाठवण्यात आले आणि काळाचौकी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त आर. रागसुधा आणि काळाचौकी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, तर पोलिसांचे एक केईएम रुग्णालय येथे दाखल झाले आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार जखमी तरुणाचा मृत्यू झाला आहे, तर तरुणीची प्रकृती चिंताजनक आहे. अद्याप पोलिसांकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. या दोघांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून हे हत्याकांड प्रेमप्रकरणातून घडले असावे, अशी शक्यता वर्तवली जात आहे. (Mumbai Crime)
हेही पहा –











