आता केवळ 20 रुपयात मिळेल पोटभर जेवण कुठे वाचा
रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता रेल्वे जनरल बोगीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अगदी स्वस्त दरात पोटभर जेवण देणार आहे. देशातील सर्व रेल्वे स्टेशनवर रेल्वेची ही नवीन योजना सुरू करण्याची योजना आहे.
मात्र, काही ठिकाणी केवळ ट्रायल म्हणून सुरू करण्याची योजना आहे. भारतीय रेल्वे स्टॉल्सच्या माध्यमातून प्रवाशांना स्वस्त जेवण उपलब्ध करून देईल. हा स्टॉल जनरल डब्यासमोर बसवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना दूरवर जाण्याची गरज भासणार नाही.
रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले की, जनरल डब्याच्या पोजिशनिंगनुसार ते लावले जातील. जेणेकरून प्रवाशांना लांब जावे लागणार नाही. ही स्किम पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरु करण्याची योजना आहे. जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्यांना खाण्यापिण्यासाठी स्टेशनवर भटकावं लागतं.
अशा स्थितीत रेल्वेने जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्यांना मोठी भेट देत इकॉनॉमी मीलची सुरुवात केली आहे. 27 जून 2023 रोजी रेल्वे बोर्डाने जारी केलेल्या पत्रात GS डब्याजवळील प्लॅटफॉर्मवर इकॉनॉमी मील देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या काउंटरची जागा विभागीय रेल्वेने ठरवायची आहे.
पुरी, भाजी आणि लोणचे 20 रुपयांना रेल्वेने निश्चित केलेल्या खाद्यपदार्थाच्या किमतीत प्रवाशांना पुरी, भाजी आणि लोणचे यांचे पाकीट 20 रुपयांना मिळणार आहे.
त्यात 7 पुर्या, 150 ग्रॅम भाजी आणि लोणचे यांचा समावेश असेल. रेल्वेच्या इकॉनॉमी मीलमध्ये काय मिळेल? मील टाइप 1 मध्ये पुरी, भाजी आणि लोणचे 20 रुपयांना मिळेल. मील टाइप 2 मध्ये स्नॅक मील (350 ग्रॅम) असेल, ज्याची किंमत 50 रुपये असेल. 50 रुपयांच्या सेनॅक्स मीलमध्ये तुम्ही राजमा-भात, खिचडी, कुलछे-चोले, छोले-भटूरे, पावभाजी किंवा मसाला डोसा घेऊ शकता.
याशिवाय प्रवाशांसाठी 200 मिमी पॅकेज केलेले सीलबंद ग्लासेस उपलब्ध असतील, ज्याची किंमत 3 रुपये ठेवण्यात आली आहे.
64 स्टेशनवर मिळेल स्वस्त जेवण ही स्किम सुरू करण्यासाठी भारतीय रेल्वेने 64 रेल्वे स्टेशनची निवड केली आहे. आधी या रेल्वे स्टेशनवर सहा महिन्यांसाठी ते सुरू केले जाईल.
नंतर ते इतर रेल्वे स्टेशनवर सुरू केले जाईल. पूर्व विभागातील 29 स्टेशन, उत्तर विभागातील 10 स्टेशन, दक्षिण मध्य विभागातील 3 स्टेशन, दक्षिण विभागातील 9 स्टेशनचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. जेथे स्वस्त भोजन उपलब्ध होणार आहे. नंतर देशभरात ही सेवा सुरु होईल.