ताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यातील सर्वच कारागृहांत होणार कीर्तनाचा गजर!


बुलढाणा : गुन्हेगारांच्या विचारांत बदल घडण्यासाठी त्यांचे प्रबोधन होणे आवश्यक आहे. त्यासाठी वारकरी आचारसंहिता परिषदेचे प्रवर्तक नीलेश महाराज झरेगावकर हे राज्यातल्या सर्व कारागृहांत कीर्तनाचा गजर घडविणार आहेत १५ जुलैला मेहकर येथील नरसिंह संस्थानमध्ये येऊन श्वासानंद गुरुपीठाचा आशीर्वाद घेऊन त्यांनी या उपक्रमाच्या शुभारंभासाठी प्रस्थान केले आहे.

राज्यात नऊ मध्यवर्ती कारागृहे, ३१ जिल्हा कारागृहे, १९ खुली कारागृहे आणि एक महिला कारागृह अशी एकूण ६० कारागृहे आहेत. या सर्व कारागृहांची क्षमता २५ हजार कैद्यांची असताना त्यात ४१ हजार कैदी ठेवण्यात आले आहेत. केवळ दंड देण्यामुळे ही संख्या घटणार नाही, तर विचारांत बदल झाल्यामुळेच ही संख्या घटेल.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button