आरोपींना अटक न केल्यास विशेष पोलीस महानिरीक्षक साहेब यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करु – विष्णूदादा भोसले
आरोपींना अटक न केल्यास विशेष पोलीस महानिरीक्षक साहेब यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करु – विष्णूदादा भोसले
सासवड : मौजे जेऊर तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथील लिलावती गायकवाड या बौद्ध समाजाच्या विधावा महिलेवर २३ जून रोजी कोयत्याने प्राण घातक हल्ला करण्यात आला आहे, या गुन्ह्यातील आरोपींवर अट्रोसिटीसह कलम,३२४,व विविध कलमानुसार गुन्हा दाखल आहे, परंतु या गुन्ह्यातील आरोपी आजही मोकाट फिरत आहेत, पोलीस त्यांना अटक करीत नाहीत, त्यामुळे पुरंदर तालुक्यातील अन्याय अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने आज दि. ५ / ७ / २०२३ मा उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग सासवड यांच्या कार्यालयासमोर आज सकाळ पासून थाळीनाद आंदोलन करण्यात आले, यावेळी बोलताना विष्णूदादा भोसले म्हणाले संबंधित आरोपींना अटक करण्यासाठी अन्याय अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने दि. २६ जून रोजी निवेदन देऊन व त्यानंतरही प्रत्येक्ष भेट घेऊन देखील उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे हे आरोपींना अटक करण्यास अनुकुल नाहीत , या अगोदर देखील रिपब्लिकन पक्षाचे युवानेते गौतम भालेराव यांच्यासह इतरावर प्राण घातक हल्ला करण्यात आला, या हल्ल्यातील उर्वरित आरोपींना अटक करण्यात यावी या मागणीसाठी, मा उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग सासवड यांच्या कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले संलग्न रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले त्यानंतर मा. ग्रामीण पोलीस अधीक्षक साहेब पुणे ग्रामीण यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले , संबंधित आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी याबाबत , मा. अनुसूचित जाती जमाती आयोग महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाने मा. ग्रामीण पोलीस अधीक्षक साहेब पुणे ग्रामीण यांना लेखी पत्र दिले आहे.तरीही स्थानिक पोलीस प्रशासन कार्यवाही करीत नाहीत, त्यामुळे या कार्यालयात पिडीत महिलेला न्याय मिळेल असे वाटत नाही, त्यामुळे आरोपींना तात्काळ अटक न केल्यास , कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक साहेब, यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करु , असा इशारा विष्णूदादा भोसले यांनी दिला, .
यावेळी अन्याय अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने, सामाजिक शांतता भंग होऊ नये, या करीता, व भितीदायक वातावरणात फिर्यादी हे प्रचंड दहशतीखाली आहेत, व पुन्हा आरोपीकडून गंभीर कृत्य घडु नये, त्यामुळे संबंधित आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीचे निवेदन ,मा. उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सासवड पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक आण्णासाहेब घोलप, विष्णूदादा भोसले, सुनिलतात्या धिवार, पंकजदादा धिवार, सामाजिक कार्यकर्ते संदीप लोंढे ,दादा गायकवाड, कैलास धिवार बळीराम सोनवणे डॉ. एन डी. धिवार पंढरीनाथ जाधव, गौतम भालेराव कुंडलिक बापू सोनवणे, आप्पासाहेब भांडवलकर, बाळासाहेब इटकर , मंगेश सोनवणे, राजाभाऊ क्षिरसागर स्वप्निल कांबळे , स्वप्निल पाटोळे, पिडीत महिला लिलावती गायकवाड, रामकृष्ण वाघमारे सर मुबारकभाई शेख, साहेबराव जाधव पल्लवी भोसले, संतोष गायकवाड, रवी भालेराव सचिन खरात आण्णा बोरडे, सचिन कांबळे , सुशिल जगताप, धनंजय भांडवलकर सुभाष लोंढे ,चक्रधारी सोनवणे, अनिल भोसले, विजय घोडेस्वार , युवराज धिवार प्रतिक धिवार , मयूर बेंगळे , अतिशय गायकवाड विकास देशमुख जया नलगे, श्रीकांत लक्ष्मीशंकर घनश्याम रणपिसे अमोल जगताप, मनिष रणपिसे, अदिक दणाने आदी मान्यवर आदी मान्यवर उपस्थित होते ,
सदर आंदोलनाचे नेतृत्व विष्णूदादा भोसले , सुनिलतात्या धिवार, पंकजदादा धिवार यांनी केले , यावेळी सुनिलतात्या धिवार पंकजदादा धिवार , श्रीकांत लक्ष्मीशंकर यांनी यावेळी यांनी यावेळी पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रणालीचा निषेध करुन आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली,
या आंदोलनास शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख , अभिजित जगताप, चर्मकार महासंघाचे गुलाबराव सोनवणे , मंगेश गायकवाड, बाळासाहेब इटकर , सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ क्षिरसागर यांनी जाहीर पाठिंबा देऊन आरोपींना अटक करण्याची मागणी केली, यावेळी मोठ्या संख्येने महिला व कार्यकर्ते उपस्थित होते,