ताज्या बातम्या

शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान, पिंपळगाव जलाल ता येवला जि. नाशिक आयोजित शहादू शिवाजी वाघ स्मृती राज्यस्तरीय दुसरा साहित्य कलाकृती पुरस्कार वितरण सोहळा संपन्न


 

शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान, पिंपळगाव जलाल ता येवला जि. नाशिक आयोजित शहादू शिवाजी वाघ स्मृती राज्यस्तरीय दुसरा साहित्य कलाकृती पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

येवला : तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान आयोजित शहादू शिवाजी वाघ स्मृती राज्यस्तरीय दुसरा साहित्य कलाकृती पुरस्कार सोहळा रविवार दि. ४ जून २०२३ रोजी संपन्न झाला . पुरस्कार सोहळ्याचे हे दुसरे वर्ष होते.. या सोहळ्यासाठी राज्यभरातील साहित्यिक उपस्थित असल्याचे अध्यक्ष मा संजय वाघ यांनी कळविले आहे.

येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान यांचे वतीने शहादू शिवाजी वाघ यांच्या स्मृती दिनानिमित राज्यस्तरीय दुसऱ्या साहित्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते..
सोहळ्याच्या सुरुवातीला पहिल्या सत्रात काव्यवाचन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेसाठी नाशिक येथील प्रसिद्ध लेखक मा राजेंद्र उगले यांनी अध्यक्षस्थान भूषविले तर उद्घाटन प्रसिद्ध गझलकार तथा मुसंडी चित्रपटाचे कलाकार मा राम गायकवाड यांनी भूषविले. या सोहळ्याचे उद्घाटन महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करून व पुष्पवर्षाव करून केले गेले.
तर दुपारच्या सत्रात साहित्य कलाकृतींवर पुष्पवर्षाव करून उद्घाटन करण्यात आले.

यावेळी प्रतिष्ठानने माहे डिसेंबर २०२२ मध्ये राज्यभरातील साहित्यिकांकडून आपल्या कलाकृती पुरस्कारासाठी मागविल्या होत्या. कथा संग्रह, कविता संग्रह , गझल संग्रह, अभंग, ओवी, पोवाडा, चारोळी, काव्यसंग्रह, कादंबरी अशा विविध प्रकारच्या राज्यभरातून जवळपास ६५ प्रवेशिका आल्या होत्या .. त्या सर्व कलाकृती तज्ज्ञ परीक्षकांकडे परीक्षणासाठी पाठविल्या होत्या त्यापैकी काव्यसंग्रहाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार यवतमाळ येथील कवी संतोष जगताप यांच्या “कृष्णालिका” या कलाकृतीला , तर कथासंग्रहाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मा डॉ सुनिता चव्हाण, बोरीवली, मुंबई यांच्या “भयातून निर्भयाकडे संवाद सेतू” या कलाकृतीला तसेच कादंबरीचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार कोल्हापूर येथील लेखक मा विकास गुजर यांच्या “बाभूळमाया या कादंबरीला तर पुणे येथील गझलकार डॉ अविनाश सांगोलेकर यांच्या “अविनाशपासष्ठी” या गझल संग्रहासाठी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कारात रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, आणि स्मरणिका असे प्रदान करण्यात आले. यावेळी कलाकृतींचे परिक्षण ख्यातनाम परीक्षक अनुक्रमे कविता संग्रहाचे मा.प्रा. विजय लोंढे, पुणे, कथा संग्रहाचे मा प्रा.डॉ निवेदिता राऊत, नागपूर, कादंबरीचे परीक्षण मा.प्रा. सुवर्णा चव्हाण, येवला नाशिक तर गझल संग्रहाचे मा प्रा. पंडित भारुड, कोपरगाव, यांचाही सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देवून सन्मान करण्यात आला.
तसेच काव्यवाचन स्पर्धेत पुरस्कार मिळालेले कवी मा सचिन साताळकर यांना प्रथम क्रमांक, कवी रतन पिंगट यांना व्दितीय क्रमांक, डॉ विजय कस्तुरे यांना तुतीय क्रमांक तर कवी संदीप राठोड आणि कवी विकास गुजर यांना उत्तेजनार्थ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, रोख रक्कम आणि स्मरणिका असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी पिंपळगाव जलाल येथील श्री नाना ठाकरे यांचा मुलगा देशसेवेत भरती झाला त्यासाठी त्यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला

या सोहळ्यासाठी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कामगार पतपेढीचे चेअरमन मा डी.के.देवकर साहेब व सर्व संचालक मंडळाची विशेष उपस्थिती होती तर प्रसिद्ध साहित्यिक राजेंद्र उगले- नाशिक, दुसरे सत्र अध्यक्ष मा सुभाषजी सोनवणे, मा. विष्णू औटीसाहेब – उपायुक्त, आयकर विभाग , औरंगाबाद , जेष्ठ विचारवंत मा. भाऊ थोरात- शिर्डी, जेष्ठ साहित्यिक संजय पठाडे सर, प्रा. मंगल सांगळे- सिन्नर, मा.प्रा. गीतांजली वाबळे, शिरूर-पुणे, मा गणेश भोसले- राळेगणसिद्धी, विस्तार कृषी विद्यावित्ता, मा. सोमनाथ माने, सेवानिवृत्त वनाधिकारी रामदास पुजारी, साप्ता. अभिनव खानदेशचे संपादक मा. प्रभाकर सूर्यवंशी, मा. प्रा. शर्मिला गोसावी, मा सुनील गोसावी , प्रसिद्ध मुखपृष्ठ चित्रकार मा. अरविंद शेलार, लेखिका सौ. सविता दरेकर, साखर कामगार पतपेढीचे मॅनेजर मा. राजेंद्र सोनवणे, मा. प्रा. तुषार ठुबे, मा. रविंद्र मालूंजकर, मा.विनोद गोळे , मा. जावेद शेख, मा सोमनाथ चौधरी, मा महाबली मिसाळ, सुनील सूर्यवंशी, सचिन माने, सतीश शेटे, अशोक नारळकर, पूजा नारळकर, आशिष खर्चे, दादाजी आहिरे, सामाजिक कार्यकर्ते विक्रम गायकवाड तसेच पिंपळगाव जलाल पंचक्रोशीतील ग्रामस्त व महाराष्ट्रातून आलेले कवी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालक बाळासाहेब शिंगोटे, पारनेर साहित्य साधना मंच, वाटचाल हास्य आनंद, आडवाटेचे पारनेर या समूहाचे सदस्य या सोहळ्याला असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. संजय वाघ, संपादक मा प्रशांत वाघ, सचिव राजेश वाघ यांनी कळविले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button