महत्वाचे

गाझियाबादमधल्या कथित धर्मांतराचं महाराष्ट्र कनेक्शन, मुंब्र्यात ४०० जणांचं धर्मांतर? डीसीपी अग्रवाल यांची माहिती


उत्तरप्रदेशातील गाझियाबादमध्ये मोबाईलमधील ऑनलाईन गेमिंगद्वारे धर्मातर करण्यात आलंय. तर गाझियाबादमधल्या धर्मांतराला महाराष्ट्र कनेक्शन असून, महाराष्ट्रातील मुंब्र्यातही 400 जणांचं धर्मांतर करण्यात आल्याची शक्यता आहे. ऑनलाईन धर्मांतर करणाऱ्या मुख्य आरोपीनं गौप्यस्फोट केल्याचं डीसीपी निपुण अग्रवाल यांनी सांगितलंय. मोबाईल गेमच्या आडून ब्रेन वॉश करत धर्मांतर करण्यात आल्याची माहिती आहे.

ऑनलाईन धर्मांतर करणाऱ्या मुख्य आरोपीची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. महाराष्ट्रातील मुंब्य्रात 400 जणांचं धर्मांतर करण्यात आल्याचं आरोपीने जबाबात सांगितलेय. या प्रकरणाचा पोलीस तपास सुरु आहे. ऑनलाईन गेमिंगचा वापर करुन ब्रेन वॉश करत धर्मांतर केले जात असल्याचे समोर आलेय, असे डीसीपी अग्रवाल यांनी सांगितलेय.

धर्मांतर कसं काय होवू शकतं?

मोबाईल गेमच्या बहाणे धर्मांतर करण्याचं प्रकऱण उत्तर प्रदेश पोलिसांनी उघड केलं..ही एक मोठी टोळी असून ती ऑनलाईन गेम खेळणाऱ्या मुलांना हेरते..सुरुवातीला या खेळात या मुलांना हरवलं जातं..मग त्यात फसवलं जातं आणि पुढे त्यांचा धर्मांतराच्या उद्देशाने ब्रेन वॉश केला जातो…आणि ही मुलं ऑनलाईन गेमच्या माध्यमातून डर्टी धर्मांतराचे शिकार होतात.

दिल्लीच्या गाझियाबादमध्ये हे असंच घडलंय. ऑनलाईन गेमच्या सहाय्याने दोन अल्पवयीन मुलांचं धर्मांतर केलं गेलंय… पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काही मुस्लिम मुलं गैर-मुस्लिम नावाने प्रोफाईल बनवून गेम खेळायची. ही टोळी गेम खेळणाऱ्यांना हरवून त्यांना कुराण पठण करायला लावायची आणि जाणूनबूजून जिंकवायची. जी मुलं कुराण वाचायची त्यांना धर्मांतर करणाऱ्या टोळीतील सदस्य प्रोत्साहन देण्यासाठी खेळात हरायचे. टोळीतील सदस्य हिंदू आयडी तयार करुन कुराणात रस दाखवणाऱ्यांशी गप्पा मारायचे आणि त्यांचा ब्रेनवॉश करायचे. इस्लामकडे कल दाखवणाऱ्या मुलांना झाकीर नाईकचे विषारी व्हिडिओ दाखवायचे, आणि इस्लामिक साहित्य पुरवायचे मुलांचे ब्रेनवॉश करून त्यांना पैसे देण्याचं आमिष द्यायचे, संधी साधत त्यांचं धर्मांतर केलं जायचं.

महाराष्ट्र कनेक्शन कसं ?

गाझियाबादमधल्या धर्मांतराला महाराष्ट्र कनेक्शन आहे. कारण यातील एक आरोपी शाहनवाज मकसूद खान हा ठाण्याच्या मुंब्र्यातील असल्याचं समोर आलंय.
मिळालेल्या माहितीनुसार आरोपी शाहनवाज खान 31 मे पासूनच फरार आहे…त्याआधी त्याने त्याच्या कुटुंबियांना सोलापूरला शिफ्ट केलं. तर 1 जूनला गाझियाबाद पोलिसांनी मुंब्रा पोलिसांशी संपर्क करुन त्यांची मदत मागितली..पण तोपर्यंत उशीर झाला होता. केरला स्टोरीमध्ये हिंदू मुलींना टार्गेट करुन त्यांचं धर्मांतर कसं केलं जातं हे दाखवलंय. पण धर्मांतराच्या याच पॅटर्नमध्ये बदल करुन मोबाईल गेम खेळणाऱ्यांना आता टार्गेट केलं जातंय. त्यात एकट्या मुंब्र्यातून 400 जणांचं धर्मांतर झालं असेल तर नक्कीच चिंतेची बाब आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button