नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा संपन्न.
जुन महिना सुरू होताच सर्वांना गणपती बाप्पाच्या आगमनाचे वेध लागते. जून महिना सुरु झाल्यावर फक्त गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आपण दिवस मोजत बसतो. अशातच जगभरात सर्वत्र ख्याती असलेल्या आणि मुंबईच्या जनतेच्या मनाचा राजा म्हणजेच लालबागचा राजा. आज लालबागच्या राजाचा पद्य पूजन सोहळा पार पडला. दरवर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात. दरवर्षी लालबागच्या राजाच्या पाद्यपूजन सोहळा अगदी धुमधडाक्यात साजरा केला जातो. मात्र यावर्षी लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा साध्या पद्धतीने पार पडला असून याची सर्वत्र चर्चा होत आहे.
लालबागच्या राज्याचा आज बुधवार दि. ०७ जून २०२३ रोजी संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने सकाळी ६.०० वाजता अगदी साध्या पद्धतीने पाद्यपूजन सोहळा पार पडला. लालबागच्या राज्याच्या पाद्यपूजन सोहळा मंडळाचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब सुदाम कांबळे व मूर्तिकार श्री. मधुसूदन कांबळी यांच्या शुभहस्ते मूर्तिकार कांबळी आर्ट्सच्या चित्रशाळेत पार पडला. लालबागच्या राज्याची ख्यातीही जगभर असून दरवर्षी लाखो गणेशभक्त लालबागच्या राज्याचे दर्शन घेण्यासाठी मुंबई गाठतात.दरवर्षी लालबागच्या राज्याची मूर्ती ही बाहेरून न आणता त्याच ठिकाणी घडवली जाते आणि त्याच ठिकाणी पाद्यपूजन सोहळा साजरा केला जातो. यावर्षी लालबागच्या राजाचा पद्य पूजन सोहळा साध्या पद्धतीने मूर्तिकार कांबळी यांच्या कार्यशाळेत पार पडला. यावर्षी लालबागच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे ९० वे वर्ष असून यंदाचा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जाणार आहे.