ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्रराजकीय

त्या २५ जणांचा बाळासाहेबांशी, शिवसेनेशी संबंधही नव्हता’; संजय राऊत अन् पवार एकाचवेळी छ. संभाजीनगरमध्ये


ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. यावेळी राऊत यांनी शिंदे गटासह भाजपवर टीका केली. संजय राऊत म्हणाले, गुवाहटीला गेलेल्या ४० आमदारांपैकी २५ आमदारांचा बाळासाहेब ठाकरेंशी आणि शिवसेनेशी काहीच संबंध आला नाही, असं भाष्य केलं. यावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
संजय राऊत म्हणाले, मी संभाजीनगर मध्ये खूप दिवसांनी आलोय. शिवसेना संभाजीनगर शाखेचा वर्धापन दीन साठी आलो आहे. संभाजीनगर आमचा पारंपरिक गड आहे. शिवसेनेतील बंडावर बोलताना राऊत म्हणाले, पाच जण पळून गेले तरी शिवसैनिक आमच्या सोबत आहेत. शिंदे गट आणि भाजपने निवडणुका घेण्याची हिंमत दाखवावी. जर तुमचे सरकार कायदेशीर आणि गतिमान आहे तर निवडणुका घ्या, असंही राऊत म्हणाले.

‘अनेक ठिकाणी तणाव आहे. कोल्हापुरात हिंदुत्ववादी रस्त्यावर आहेत, राज्यातील वातावरण तणावग्रस्त आहे. फक्त निवडणुकीसाठी हिंदुत्व दाखवायचे. धर्माच्या नावावर पुन्हा निवडणुका लढवायच्या. कर्नाटक निवडणुकीतही हेच झालं, पण कर्नाटकच्या जनतेने हे उधळून लावलं. महाराष्ट्रात सुद्धा हेच होणार याची त्यांना भिती आहे, असा टोलाही राऊत यांनी भाजपला लगावला.

‘संभाजीनगरमध्येच औरंगजेबला गाडले आहे हिच ती भुमी यात औरंगजेबाला गाडले आहे. औरंगजेबाचे जे कुणी भक्त असतील तर त्यांनी महाराष्ट्रातच नव्हे तर देशातून निघून जावे, असंही राऊत म्हणाले. जर या सरकारमध्ये शुध्द हिंदुत्व वाली आहेत, तर मग औरंगजेबचे फोटो कसे दाखवले जातात, असंही राऊत म्हणाले.

पुण्यातील ‘डीआरडीओ’चे संचालक डॉ. कुरुलकर ज्याने पाकिस्तानला भारताची गुपितं विकली. तो आरएसएसचा प्रमुख कार्यकर्ता होता. त्याच्या विरोधातही मोर्चा काढायला हवा होता. औरंगजेबा इतकाच हा विषय गंभीर आहे. संघाचे काही लोकं पाकिस्तानशी हातमिळवणी करतात. देशाची गुपिते विकली जातात. हनी ट्रॅपमध्ये सापडले जातात. हा विषय कोल्हापूर, नगरमध्ये औरंजेबाचा स्टेट्स ठेवण्या एवढाच गंभीर आहे. गुन्हेगारांवर कठोर टीका केली पाहिजे, राज्यात शांतता राहावी, सर्व जाती धर्मांना समान न्याय मिळावा, अशी आमची मागणी असल्याचे राऊत म्हणाले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button