फडणवीसांनी आणली ७१ हजार कोटींची गुंतवणूक! विरोधकांची तोंडं बंद!
मुंबई : महाराष्ट्र सरकारचे नॅशनल हायड्रो पॉवर कॉर्पोरेशन ७,३५० मेगावॅट आणि टोरंट पावर ५,७०० मेगावॅट यासोबत १३,०५० मेगावॅट उदंचन ऊर्जा प्रकल्पांसाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यामुळे राज्याच्या इतिहासातील हा एक सर्वात करार असणार आहे. त्याचबरोबर, महाराष्ट्र राज्याची विकासाची गती कायम राखण्यासाठी फडणवीस-शिंदे सरकारकडून स्तुत्य पाऊल उचलले गेले आहे. “जे लोक उद्योग इकडे गेले तिकडे गेले असे म्हणत होते त्यांची तोंडे या गुंतवणुकीमुळे आम्ही बंद केली”, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना टोला लगावला. महाराष्ट्र नंबर वन होता आणि आताही नंबर वनचं आहे, असे म्हणत, ते जे करू शकले नाही ते आम्ही करून दाखवले असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
आज जलविद्युत प्रकल्प विकासासाठी सामंजस्य करार करण्यात आले. या अंतर्गत राज्यात १३,०५० मेगावॉट क्षमतेचे उदंचन प्रकल्प उभारले जाणार आहेत. मुंबई येथे राज्याच्या ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव, नॅशनल हायड्रो पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड व टोरंट पावर लिमिटेड यांच्या पदाधिकाऱ्यांनी दि. ६ जून रोजी दुपारी सह्याद्री अतिथीगृह येथे या करारावर हस्ताक्षर केले आहेत.
या महत्त्वाच्या करारामुळे महाराष्ट्र राज्याला अनेक फायदे होणार आहेत. या करारामुळे राज्यात एकून ७१ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. यामुळे राज्यात रोजगारनिर्मिती होण्यास मदत मिळणार आहे. जवळपास ३० हजारजणांना रोजगार या करारामुळे मिळणार आहे. तसेच, शेती, उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्रातील विजेची वाढती मागणी भागवता येणार आहे. त्याचप्रमाणे, हरित आणि स्वच्छ ऊर्जा निर्मितीमुळे पर्यावरणाचे संरक्षण होण्यास मदत मिळेल. ग्रीड बॅलन्सिंग, पीक डिमांड पूर्ण करणे, ब्लॅक स्टार्ट इत्यादी बाबतीत महाराष्ट्र स्वावलंबी होईल.