ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

आक्षेपार्ह स्टेट्सप्रकरणी बुधवारी कोल्हापूर शहर बंदची हाक


एका तरूणाने जातीय तेढ निर्माण करणारा स्टेटस लावल्याने कोल्हापुरात आज (दि.६) तणावपूर्ण वातावरण बनले. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडत हिंदुत्ववादी संघटनांनी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, बुधवारी (दि. ७) कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली आहे. तर शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

शहरातील दसरा चौक टाऊन हॉल आणि लक्ष्मीपुरी परिसरात दगडफेकीच्या घटना घडल्या. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज करत जमाव पांगवला. दरम्यान, बुधवारी सकाळी नऊ वाजता हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी चौकात जमण्याचे आवाहन बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीने बंडा साळुंखे यांनी केले आहे. कोल्हापुरात यापुढे कोणाचीही असा स्टेटस लावायची हिम्मत होणार नाही, असा बंद करणार असल्याचा इशारा बंडा साळुंखे यांनी दिला आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button