कोल्हापुरात नवीन राजवाड्यात पहिल्यांदाच शिवराज्याभिषेक सोहळा, तयारी अंतिम टप्प्यात
कोल्हापुरात उद्या (6 जून) नवीन राजवाड्यावर पहिल्यांदाच शिवराज्याभिषेक सोहळा दिमाखदार पद्धतीने साजरा होणार आहे. शिवराज्यभिषेक दिनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी या तयारीची पाहणी केली. सकाळी साडेसात वाजल्यापासून या सोहळ्याला सुरुवात होणार आहे.
या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित राहणार असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णमूर्तीवर अभिषेक करण्यात येणार आहे. शाहू महाराज छत्रपती यांनी हा शिवराज्याभिषेक सोहळा 349 वा असल्याचे सांगितले.एकीकडे संभाजीराजे छत्रपती रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करत आहेत.
दुसरीकडे नवीन राजवाडा या ठिकाणी शाहू महाराज, मालोजीराजे आणि संपूर्ण छत्रपती घराण्यातील सदस्यांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होणार आहे. मात्र, यावर्षीपासून नवीन राजवाड्यावर खूप मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.