ताज्या बातम्यापुणेमहत्वाचेमहाराष्ट्र

वडिलांना पदोन्नती, तर लेकीचा केंद्रीय लोकसेवा आयोगात डंका


 

खोर(पुणे): एकाच दिवशी वडील सुभाष दत्तात्रय कोकाटे यांची उपविभागीय पोलिस आयुक्तपदी पदोन्नती, तर मुलगी श्रुती सुभाष कोकाटे या केंद्रीय लोकसेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन जिल्हाधिकारी पदी नियुक्ती झाली. ग्रामीण भागातील पार्श्वभूमी असलेल्या कोकाटे परिवाराने एक नेत्रदीपक यश प्राप्त केल्याबद्दल दौंड तालुका नाभिक संघाच्या वतीने सुभाष कोकाटे व श्रुती यांचा सत्कार करण्यात आला. सुभाष कोकाटे हे चोपडज (ता.कर्जत) येथील आहेत.

एकाच कुटुंबातील दोन्ही बाप-लेकीने प्रशासन विभागात आपले पाऊल ठेवले असल्याने वरवंड (दौंड)मध्ये या परिवाराचा सत्कार करण्यात आला. या वेळी दौंड तालुका नाभिक संघाचे अध्यक्ष गणेश साळुंके, पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या हस्ते श्रुती कोकाटे व सुभाष कोकाटे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नवनाथ सोनवणे, रवींद्र गायकवाड, सूर्यकांत अडसूळ, विनोद साळुंके उपस्थित होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button