मुंबई महापालिका निवडणुकीच्या धर्तीवर ‘सागर’ बंगल्यावर खलबतं; फक्त ‘या’ लोकांना आमंत्रण
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यावर खलबते होणार आहे.यासाठी मुंबईतील भाजपचे सर्व आमदार व खासदारांना आज बैठकीचे आमंत्रण देण्यात आले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या धर्तीवर महत्त्वाची रणनीती ठरवली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. देशातील सर्वात महत्त्वाची असलेल्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक कधीही लागण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका काबिज करण्यासाठी भाजपने रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे.
याचाच भाग म्हणून आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर बैठक बोलवण्यात आली आहे. मुंबईतील भाजपचे सर्व आमदार व खासदारांना आज बैठकीचे आमंत्रण देण्यात आले आहे. विधानसभा, विधानपरिषद आमदार आणि लोकसभा व राज्यसभा खासदार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्व आमदार व खासदारांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या धर्तीवर महत्त्वाची रणनीती या बैठकीत ठरवली जाणार आहे.