अवघ्या ३६ तासांच्या आत स्टेट बँक दरोड्याची उकल
जळगावात कलिंका माता मंदिर परिसरात १जून रोजी सकाळी सडे नऊ वाजेच्या सुमारास दोन हेल्मेटधारी आरोपींनी बँक मॅनेजरला जखमी करून १७ लाखांची रोकड आणि तीन कोटी साठ लाखांचा ऐवज लुटून फरार झाल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा पोलिस दलासमोर आव्हान निर्माण झाले होते.मात्र शनिपेठ आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या विभागाने केलेल्या संयुक्त कारवाईत या दरोड्याची अवघ्या ३६ तासांत उकल झाली आरोपीना राग जिल्ह्यातील कर्जत येथून मुद्देमालासह तीन जणांना अटक करण्यात आली. आरोपींकडून १६ लाख ४० हजार रोख आणि तीन कोटी साठ लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे. मुख्य आरोपी शंकर रमेश जासक ,,रमेश शंकर जासक , आणि बँक कर्मचारी मनोज रमेश सूर्यवंशी अशी आरोपींची नावे आहेत. आरोपीना आज न्यायालयात हजर करण्यात आले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.