मुंडे, खडसे भेटीवर शिंदे गटाची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले…
छत्रपती संभाजीनगर, 3 जून : आज भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भेट घेतली. या दोघांमध्ये तब्बल अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली. या भेटीमुळे चर्चेला उधाण आलं आहे. या भेटीनंतर राजकीय वतुर्ळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. या भेटीवर शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. पंकजाताई आमच्याकडे आल्या तर स्वागतच असं शिरसाट यांनी म्हटलं आहे.
संजय शिरसाट यांच्या या वक्तव्यानंतर चर्चाला उधाण आलं आहे. नेमकं काय म्हटलं शिरसाट यांनी? पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे या सात- आठ महिन्यानंतर असे विधान करतच असतात, आणि त्यानंतर लगेचच त्या माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला अशी प्रतिक्रिया देतात. पंकजा मुंडे या वजनदार नेत्या आहेत.
सगळ्याच पक्षांना वाटते त्यांनी आपल्या पक्षात यावं. पंकजाताई आमच्याकडे आल्या तर त्याचं स्वागतच आहे. पण तसे होणार नाही, आम्हाला सोबत काम करायचं आहे. भाजप त्यांना भविष्यात योग्य जागा देईल असं शिरसाट यांनी म्हटलं आहे.
खडसे, मुंडे भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अजित पवारांची प्रतिक्रिया दरम्यान या भेटीवर अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.पंकजा मुंडे यांचा तो पक्षांतर्गत प्रश्न आहे, त्यावर बोलनं योग्य होणार नाही. मुंडे आणि खडसे यांनी अनेक वर्ष एकाच पक्षात काम केलं आहे. खडसे मुंडेसाहेबांना मानतात असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.