ताज्या बातम्यामुंबई

धोनीच्या चाहत्यांच्या चिंतेत भर घालणारी बातमी, फायनल जिंकल्यानंतर नवी अपडेट


आयपीएल 2023 च्या फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्सचा पाच विकेटने पराभव केला. याचसह चेन्नईने पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं.आयपीएल जिंकल्यानंतर सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. एमएस धोनीच्या गुडघ्याची दुखापत वाढली असून तो या आठवड्यात मुंबईतल्या हॉस्पिटलमध्ये दाखल होणार आहे. हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर एमएस धोनीच्या वेगवेगळ्या टेस्ट करण्यात येणार आहेत. आयपीएल 2023 चा संपूर्ण मोसम धोनी गुडघ्याची दुखापत घेऊनच खेळला.

मॅचदरम्यान अनेकवेळा धोनीच्या डाव्या गुडघ्यावर पट्ट्या बांधून खेळताना दिसला. एमएस धोनीचा आयपीएलचा हा शेवटचा मोसम असेल असा कयास अनेकांनी बांधला होता, तसंच आयपीएल जिंकल्यानंतर धोनी निवृत्तीची घोषणा करेल, असंही बोललं गेलं. आयपीएल फायनल जिंकल्यानंतर धोनीला निवृत्ती घेणार का? असं विचारण्यात आलं, त्यावर धोनीने स्पष्ट उत्तर दिलं.

‘खरंतर निवृत्तीची घोषणा करण्याची ही योग्य वेळ आहे, पण मला चाहत्यांकडून खूप प्रेम मिळालं आहे. गुडबाय म्हणणं माझ्यासाठी सगळ्यात सोपं असेल, पण पुढचे 9 महिने कठोर परिश्रम करून पुन्हा खेळायला येणं माझ्यासाठी आव्हान असेल. खेळायचं का नाही हे ठरवण्यासाठी माझ्याकडे 6-7 महिने आहेत. मी माझ्या चाहत्यांना निराश करू शकत नाही.

मी आणखी एक मोसम खेळेन, पण शरिराने साथ दिली पाहिजे,’ असं धोनी म्हणाला. विजयानंतर धोनी झाला भावुक, जडेजाला उचलून घेताच मिटले डोळे, झिवा बिलगलीफायनलचा रोमांचक शेवट आयपीएल फायनलच्या शेवटच्या 2 बॉलवर चेन्नईला विजयासाठी 10 रनची गरज होती, तेव्हा रवींद्र जडेजाने मोहित शर्माच्या पाचव्या बॉलला सिक्स आणि सहाव्या बॉलला फोर मारली आणि सीएसकेला रोमांचक विजय मिळवून दिला. याचसोबत चेन्नईने पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली. आयपीएल इतिहासामध्ये सर्वाधिक ट्रॉफी जिंकण्याचा विक्रम चेन्नई आणि मुंबईच्या नावावर आहे. जडेजानं 2 बॉलमध्ये फिरवला सामना; बॉलरला कोसळलं रडू, पण पांड्यानं सावरलं.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button