ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

गरीब राशन धारकांना धान्य न देता दादागिरी करनाऱ्या त्या स्वस्त धान्य दुकानदाराचा परवाना रद्द करा-पप्पु गायकवाड


गरीब राशन धारकांना धान्य न देता दादागिरी करनाऱ्या त्या स्वस्त धान्य दुकानदाराचा परवाना रद्द करा. पप्पु गायकवाड

शिराळा येथील शिधापत्रिका धारकांचे अंगडे घेवुन दम देऊन धान्य दिलेच नाही.

गेवराई : तालुक्यातील शिराळा येथील स्वस्त धान्य दुकानदार राशन कार्ड धारकांकडून बायोमेट्रिक मशिनवर अंगठे घेवुन त्यांना धान्य न देता आरेरावी व दागिरी करत असल्याची गंभीर बाब स्थानिकांनी वंचित बहुजन आघाडी गेवराई तालुका अध्यक्ष पप्पु गायकवाड यांच्याकडे तक्रार केल्याने उघडकिस येताच, त्यांनी तात्काळ तहसिलदार व जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन त्या स्वस्त धान्य दुकानदाराचा परवाना रद्द करण्याची ताकीद दिली.
स्वस्त धान्य दुकानदाराने रेशनकार्ड धारकांचे अंगठे घेतले व तुमचे अंगठे लागले नाही असे सांगून एप्रिल महिन्याचा शिधा वाटप केला नाही. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्य सरकारकडून आलेला डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिधा उशीरा वाटप करून एप्रिल महिन्याचा शिधा वाटप केला नाही.
धान्य मिळाले नसल्यामुळे रेशन कार्ड धारकांनी आम्हाला धान्य कधी देणार अशी विचारणा केली असता सदरील स्वस्त धान्य दुकानदाराने उध्दटपणे आरेरावी व शिविगाळ करत मि धान्य देत नाही, तुम्हाला तहसिलदार, जिल्हाधिकारी नायतर अजून कोणाकडे तक्रार करायची ती करा माझ कोणी वाकड करु शकत नाही.
अंत्योदय योजनेतील अनेक रेशनकार्ड धारकांची नावे कमी करुन त्यांची नावे शेतकरी रेशनकार्ड या यादीत समाविष्ट केले आहेत. या मुजोर स्वस्त धान्य दुकानदाराचा परवाना तात्काळ रद्द करून तो ईतरास सुपूर्द करावा नसता वंचित बहुजन आघाडीच्यावतिने रेशनकार्ड धारकांसह महसुल प्रशासनाविरोधात तिव्र स्वरूपाचा रास्ता रोको करु तसेच या अंदोनास सर्वस्वी संबंधीत अधिकारी जबाबदार राहतील असे वंचित बहुजन आघाडी गेवराई तालुका अध्यक्ष पप्पु गायकवाड यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे सुचित केले.

अश्याच माहितीसाठी आणि बातम्यासाठी येथे🪀 क्लिक करून whatsapp ग्रुपला नक्की जॉइन व्हा.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button