ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

पुणे कोणत्याही प्रकारचे धागेदोरे नसताना आरोपींना केवळ 24 तासांच्या आत जेरबंद


पुणे: कोणत्याही प्रकारचे धागेदोरे हाती नसताना एका अनोळखी व्यक्तीच्या खुनातील आरोपींना केवळ 24 तासांच्या आत जेरबंद करून हा गुन्हा उघडकीस आणण्याची कामगिरी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी बजावली आहे.
लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्याचे हद्दीमधील आपटी धामनदरा याठिकाणी सदर खुनाचा गुन्हा घडला होता.

मिळालेल्या माहितीनुसार आपटी धामनदरा मधील धनगरवस्ती येथील स्मशानभूमीजवळील ओढयालगत एका अनोळखी व्यक्तीचा खून करण्यात आला होता. पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टीने त्याच्या अंगावरील कपडे काढून, मृतदेह नग्न अवस्थेमध्ये टाकून दिला होता. शनिवारी सायंकाळी ही माहिती दुधीवरेचे सरपंच पांडुरंग घारे यांना मिळताच त्यांना ही माहिती पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांना कळवली.

 

घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन पो. नि. किशोर धुमाळ व सहा. पोलिस अधीक्षक आयपीएस सत्यसाई कार्तीक यांनी घटनास्थळी भेट दिली. खून झालेल्या व्यक्तीविषयी कोणतीही माहिती नसताना, हा गुन्हा कोणत्या कारणास्तव घडला असे अनेक प्रश्न असताना तपास करण्याचे व गुन्हा उघडकीस आणण्याचे आवाहन पोलिसांसमोर होते. त्यासाठी पोलिस तपासी पथके तयार केली.

मृतदेहाची तपासणी केली असता त्याचे फक्त रमेश एवढंच नाव समोर आले. खून झालेला व्यक्ती काय काम करीत होता, त्याचा कोणाशी काय संबंध होता, याबाबत माहिती जमा करून त्याची साखळी जुळवून पोलिसांना तपासात काही धागेदोरे मिळाले. त्या आधारे केलेल्या तपासामध्ये संशयितांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विकास मारुती कोळी (23 ) व गणपत किसन कोळी (30 वर्षे, दोन्ही रा. धामनदरा, कातकरीवस्ती, पवनानगर, ता. मावळ) यांना जेरबंद केलं.

अश्याच माहितीसाठी आणि बातम्यासाठी येथे🪀 क्लिक करून whatsapp ग्रुपला नक्की जॉइन व्हा.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button