ताज्या बातम्या

पीएम किसान योजनेच्या 14व्या हप्त्यासाठी करावे लागणार हे काम, अन्यथा मिळणार नाहीत पैसे


नवी दिल्ली:भारत हा कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे देशातील बहुतांश नागरिक शेती करत आहेत. देशातील जवळपास निम्म्याहून अधिक नागरिक शेतीवर अवलंबून आहेत. त्यामुळे शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत.
केंद्र सरकारकडून देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेमधून शेतकऱ्यांसाठी सरकार आर्थिक मदत म्हणून वर्षाला ६ हजार रुपये ३ हफ्त्यांमध्ये देत आहे.

आतापर्यंत शेतकऱ्यांना सरकारकडून १३ हफ्ते देण्यात आले आहेत. जवळपास या योजनेद्वारे शेतकऱ्यांना २६ हजार रुपये देण्यात आले आहेत. आता लवकरच शेतकऱ्यांना १४ वा हफ्ता देण्यात येणार आहे. मात्र त्याआधी शेतकऱ्यांना एक काम करावे लागणार आहे.

पीएम किसान योजनेसाठी ई-केवायसी अनिवार्य

जर शेतकऱ्यांना १४व्या हफ्त्याचे पैसे हवे असतील तर त्यांना सर्वात प्रथम ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. अन्यथा त्यांना पैसे मिळणार नाहीत. ई-केवायसी केलेल्या शेतकऱ्यांनाच १४व्या हफ्त्याचा लाभ दिला जाणार आहे.

असे करा ई-केवायसी

सर्वप्रथम, पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाइटला pmkisan.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
पृष्ठावरील ई-केवायसी वर ा.
यानंतर एक नवीन पेज उघडेल. आधार क्रमांक टाका आणि शोधा.
यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल.
पेजवर OTP टाकून सबमिट करा.
आधार नोंदणीकृत मोबाइल ओटीपी प्रविष्ट करा आणि तुमचे ई-केवायसी केले जाईल.

14 व्या हप्त्याचे पैसे कधी येणार

यापूर्वी 27 फेब्रुवारी 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान सन्मान निधीचा 13 वा हप्ता जारी केला होता. 13व्या हप्त्यासाठी केंद्र सरकारने 16000 कोटींहून अधिक रक्कम जारी केली होती.

ज्याचा फायदा देशातील 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना झाला. किसन भाई 13व्या हप्त्यानंतर आता 14व्या हप्त्याबद्दल उत्सुक आहेत. 14व्या हप्त्याचे पैसे त्यांच्या खात्यात कधी येतील हे त्यांना जाणून घ्यायचे आहे.

पात्र शेतक-यांना सरकार दर वर्षी 6000 ची आर्थिक मदत करेल. केंद्र सरकार हे पैसे 2000-2000 रुपयांच्या 3 हप्त्यांमध्ये देते. त्याचा पहिला हप्ता एप्रिल ते जुलै, दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्चपर्यंत पाठविला जातो.

अश्याच माहितीसाठी आणि बातम्यासाठी येथे🪀 क्लिक करून whatsapp ग्रुपला नक्की जॉइन व्हा.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button