शाहांची शिंदे, फडणवीसांसोबत पाऊण तास चर्चा; राजकीय घडामोडींना वेग
मुंबई: मोठी बातमी समोर येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते आशिष शेलार यांच्यासोबत जवळपास पाऊण तास चर्चा केली.
आमदार पराग अळवणी यांच्या विलेपार्ले येथील निवासस्थानी ही चर्चा झाली. केंद्रयी गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांत नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप अस्पष्ट आहे. मात्र आगामी मुंबई महापालिका निवडणुकीवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पहाता या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
चर्चेला उधाण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबईत एका खासगी कार्यक्रमासाठी आले आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी अमित शाह आणि त्यांच्यामध्ये आमदार पराग अळवणी यांच्या विलेपार्ले येथील निवासस्थानी चर्चा झाली. तब्बल पाऊण तास चर्चा झाली.
ही चर्चा नेमकी कशावर झाली हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र या भेटीमुळे चर्चेला उधाण आलं आहे. मुख्यमंत्री बदलाची चर्चा दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुख्यमंत्री बदलाची जोरदार चर्चा सुरू आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील काही दिवसांपूर्वी मोठा गौप्यस्फोट केला होता. दिल्लीतून मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरू झाल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आज अमित शाह यांनी आपल्या मुंबई दौऱ्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानं पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
अश्याच माहितीसाठी आणि बातम्यासाठी येथे🪀 क्लिक करून whatsapp ग्रुपला नक्की जॉइन व्हा.