दिगंबर काळे व गौतम कांबळे यांचा भिमरत्न पुरस्काराने सन्मान
दिगंबर काळे व गौतम कांबळे यांचा भिमरत्न पुरस्काराने सन्मान
दिगंबर काळे केंद्रप्रमुख उपळाई जिल्हा सोलापूर व गौतम कांबळे राज्याध्यक्ष कास्ट्राईब शिक्षक महासंघ तसेच गटविकास आधिकारी अजय जोशी,सहायक गटविकास आधिकारी जयश्री दोंदे,गटशिक्षणाधिकारी जीवन कोकणे,विस्तार आधिकारी मुकुंद देंडगे,वरीष्ठ शिक्षण अधिक्षक शेखर गायकवाड,वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजकिरण केंद्रे यांना महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघ खेड व सम्यक प्रतिष्ठान खेड तालुक्याच्या वतीने”भिमरत्न गौरव” या पुरस्काराने आमदार दिलीपशेठ मोहिते पाटील यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. याविषयी अधिक माहिती देताना सम्यक प्रतिष्ठान खेड तालुका संस्थेचे पदाधिकारी पुणे जिल्हा कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे अध्यक्ष विनोद चव्हाण व खेड तालुका अध्यक्ष दत्तात्रय शिनगारे म्हणाले की,दिगंबर काळे व गौतम कांबळे तसेच वरील सर्व मान्यवरांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले .खेड तालुका कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्यावतीने स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज , भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर,क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ,महात्मा ज्योतीबा फुले,आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे,क्रांतिवीर उमाजी नाईक आदि महापुरूषांची संयुक्त जयंती व शिक्षक मेळाव्याचे आयोजन राजगुरुनगर जिल्हा पुणे येथे मोठ्या उत्सहात संपन्न झाले.या वेळी बाल व्याख्याती शेवंती महेश कांबळे,स्नेहा विशाल डोळस व व्याख्याते कैलास मुसळे,दिगंबर काळे यांचे व्याख्यान झाले,खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा देखील संघटनेच्यावतीने सन्मान करण्यात आला . तद्नंतर आमदारांनी महापुरूषांच्या कार्याची माहिती देऊन आज मी जो काय आहे ते केवळ डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या पुण्याईमुळे आहे .खेड तालुका कास्ट्राईब शिक्षक महासंघाचा हा संयुक्त जयंती उपक्रम अतिशय उल्लेखनीय व सर्व समाजाने आदर्श घ्यावा असा कार्यक्रम राबविला . त्याबद्दल संघटनेचे अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या .यावेळी संघटनेचे सतीश यानभुरे यांच्या “धुळधाण ” या कथासंग्रहाचे प्रकाशन देखील करण्यात आले .कार्यक्रमास पदवीधर शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शांताराम नेहरे,एकल शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय राळे,जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष सचिन गावडे,वस्तीशाळा संघटनेचे बबनराव गावडे,शिक्षक समितीचे अध्यक्ष सूर्यकांत शिंदे,आदिवासी उन्नती संघटनेचे अध्यक्ष अशोक बांगर,सतीश भालचिम, दादाभाऊ मुंढे,दत्तात्रय भालचिम,केंद्रप्रमुख भरत लोखंडे,नामदेव गायकवाड,कुंडलिक सातकर,योगेश क्षीरसागर,मुख्याध्यापिका सुरेखा सिरसठ,राजश्री वीर,वृषाली खरात,सुरेखा काळे,निलीमा माकोडे, पांडुरंग आव्हाड,कल्पना टाकळकर,साधना घाटकर,शितल गायकवाड, रेखा चव्हाण विद्या डोळस,भास्कर गाडगे,जयमनी हिरे,अजय भालेराव,संघाचे नेते धर्मराज पवळे , राज्य उपाध्यक्ष राजेश कांबळे,तानाजी म्हाळूंगकर , उपाध्यक्ष विठ्ठल भटकर,नारायण करपे, संदिप जाधव,अशोक सावंत ,दिनेश ठाकूर सम्यक शिक्षक नेते गौतम कांबळे मामा,संदिप लगाडे, इश्वर वाघमारे,दिनेश धाकडे,संदिप तुपे,राजकिरण वाघमारे,विजय शिनगारे, धनाजी कोळी संजय सुपे , महिला अध्यक्षा प्रियंका कडलग , राज्य महासचिव विठ्ठल सावंत, राज्य कोषाध्यक्ष चंद्रकांत सलवदे,हवेली तालुकाध्यक्ष राहुल गायकवाड ,बारामती तालुकाध्यक्ष विनोद भिसे,पुणे म.न.पा अध्यक्ष कैलास थोरात ,जिल्हा उपाध्यक्ष दिपक कदम आदि पदाधिकारी उपस्थित होते .संघटनेच्या उल्लेखनीय कार्याबद्दल जिल्हाध्यक्ष विनोद चव्हाण व तालुकाध्यक्ष दत्तात्रय शिनगारे यांचा संघटनेच्यावतीने सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला . या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक विशाल शिंदे यांनी केले . व सर्व मान्यवरांचे आभार सचिव अशोक सोनवणे यांनी मानले.