क्राईमताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

जमीन विक्रीची खरेदी दस्त नोंदणी पळविली


संगमनेर:जमीन विकत घेणार्‍या शेतकर्‍याकडून 15 लाख रुपये घेतल्यानंतर खरेदीचा दस्त नोंदणी पळवून नेल्याचा अजब प्रकार संगमनेरमध्ये उघडकीस आला. दरम्यान, पिडित शेतकर्‍याने या संदर्भात शहर पोलिस स्टेशन, पोलिस उपाधीक्षक व पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली, मात्र काहीच उपयोग न झाल्याने शेवटी त्यांनी थेट न्यायालयामध्ये दाद मागितली. न्यायालयाच्या आदेशानुसार शहर पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अश्याच माहितीसाठी आणि बातम्यासाठी येथे क्लिक करून whatsapp ग्रुपला नक्की जॉइन व्हा.

संगमनेर तालुक्यातील पिंपरी लौकी अजमपूर येथील रहिवासी अमोल रामदास गीते व रामदास लक्ष्मण गीते हे जवळचे नातेवाईक आहेत. गावातील रामदास गीते यांची शेत जमीन विक्रीस काढल्याची माहिती सचिन गिते यास समजली. सचिनच्या वडिलांनी शेती खरेदी करण्यासंदर्भात व्यवहार करता येईल का, अशी रामदास यास विचारणा केली. यावर ‘आम्हाला शेती विकायची आहे. तुम्ही विकत घेऊ शकता,’ असे त्याने सांगितल्यामुळे जमीन विकत घेण्याचे ठरले.

जमिनीचा मोबदला म्हणून 15 लाख रुपये रक्कम देण्याचा व्यवहार सचिन व रामदास या दोघांमध्ये ठरला. यानुसार सचीनने 5 लाख रुपये पिंपरी लौकी अजमपूर येथे रामदासला दिले. दोघांच्या सहमतीने मिळकतीचे खरेदी खत करण्याचे ठरले. संगमनेर येथे खरेदी खत लिहून घेण्यात आले. साक्षीदारांनी सह्या केल्या.

सदरचे खरेदीचे दस्त नोंदविण्यासाठी सहाय्यक दुय्यम निबंधकांच्या कार्यालयात देण्यात आला मात्र, ‘आम्हाला उर्वरित रक्कम तत्काळ पाहिजे,’ असे रामदास सचिनला म्हणाला. यानंतर सचिन व त्याच्या वडिलांनी उर्वरित रक्कम रोकड व चेकच्या स्वरूपात रामदासला दिली. यानंतर खरेदी करण्याचे ठरले, मात्र ज्या दिवशी खरेदीचे कागदपत्रे नोंदविण्यात येणार होते, त्या दिवशी नोंदणी कार्यालयात इंटरनेटचे सर्व्हर बंद पडल्यामुळे खरेदी खताचा दस्त नोंदविता आला नाही.

दुसर्‍या दिवशी सर्वजण साक्षीदारांसह नोंदणी कार्यालयामध्ये गेले. दस्ताची डाटा एन्ट्री होऊन तो नोंदविण्यास ठेवला असता, रामदास याने सर्वांची नजर चुकवून मूळ खरेदीखताचा दस्त घेऊन तेथून पळ काढला. जमिनीची खरेदी न देता कागदपत्रांसह तो गायब झाल्याचे सचिनला समजले. आपली 15 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे सचिनला समजले.

यानंतर त्याने या संदर्भात शहर पोलिस ठाणे, पोलिस उपाधीक्षक व जिल्हा पोलिस प्रमुखांकडे तक्रार केली, मात्र काहीच उपयोग झाला नाही. म्हणून सचिन याने न्यायालयात तक्रार दाखल केली होती. अखेर न्यायालयाच्या आदेशानंतर सचिन गिते यांच्या फिर्यादीवरून पोलिसात अमोल गिते व रामदास गिते या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.

अश्याच माहितीसाठी आणि बातम्यासाठी येथे क्लिक करून whatsapp ग्रुपला नक्की जॉइन व्हा.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button