बीडच्या सीईओंचा दणका, शालेय पोषण आहारावर डल्ला मारणारा मुख्याध्यापक निलंबित
बीड:बोगस पटसंख्या दाखवत शालेय पोषण आहारावर डल्ला मारणाऱ्या मुख्याध्यापकाला बीड जिल्हा परिषदेच्या सीईओंनी चांगलाच दणका दिला आहे बीडच्या पाटोदा तालुक्यात असणाऱ्या वडझरी येथील संत शिरोमणी भगवानबाबा प्राथमिक आश्रम शाळेमध्ये शालेय पोषण आहार योजनेत प्रचंड प्रमाणात अनियमितता आढळून आली.
याप्रकरणी मुख्याध्यापक प्रवीण लिंबाजी वनवे (pravin limbaji vanve) यांना निलंबित करण्यात आले आहे. त्याचबरोबर त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित करण्याचे आदेशही मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांना दिले आहेत.
मातोश्री सेवाभावी संस्था संचलित संत शिरोमणी भगवानबाबा प्राथमिक आश्रम शाळा वडझरी, ता. पाटोदा, जि. बीड यांनी बोगस तसेच भुतलावर अस्तित्वात नसलेल्या पटसंख्या दाखवून वर्गवाढ करणे, विद्यार्थ्यांची बोगस संख्या दाखवून शालेय पोषण आहार गैरव्यवहार तसेच शिक्षक पात्रता परीक्षा पास नसताना शिक्षक भरती करून शैक्षणिक वर्ष 2022-22 मध्ये शासनाची फसवणूक करून कर्मचारी भरती करणे आदी गैरव्यवहार प्रकरणात कारवाई करावी, यासाठी सहशिक्षक धनंजय सानप व त्यांच्या सहकाऱ्यांनी वारंवार निवेदने दिली.
त्यानंतर भ्रष्टाचार निर्मूलन समितीने 29 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भीक मांगो आंदोलन (aandolan) करून वारंवार पाठपुरावा केला होता. त्यानंतर आता सोईओ पवार यांनी ही कारवाई केली आहे.
अश्याच माहितीसाठी आणि बातम्यासाठी येथे🪀 क्लिक करून whatsapp ग्रुपला नक्की जॉइन व्हा.